lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-Jun-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. महिन्याची सुरुवात सुद्धा आपणास अनुकूल असेल. आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने आपण बऱ्याचशा कामांचे नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल. कोणत्याही प्रकारच्या वादाचे निराकरण करू शकाल. आपसातील संबंधात सलोखा ठेवण्यावर आपला भर असल्याने आपले व्यक्तिगत जीवन सुंदर होईल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात नवीन रोमांच जाणवेल. वैवाहिक जोडीदाराकडे एक उत्तम मैत्रीण व एक प्रेमिका ह्या नजरेने बघितल्यास आपल्या संबंधात खूप मोठी सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी हा महिना चढ - उतारांचा आहे. आपणास आपल्या प्रेमिकेच्या भेटीसाठी बराच वेळ ताटकळत राहावे लागेल व त्यामुळे आपण थोडे कंटाळू शकता. तसे पाहू गेल्यास प्रेमासाठी हि सुद्धा एक चांगली बाब आहे, कि ज्यात आपणास तिची प्रतीक्षा करावी लागते. तेव्हा खुश राहा. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी संभाव्य वाद टाळावेत. त्यांनी आपल्या परिश्रमांवर विश्वास ठेवावा. आपण यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात शांत राहून कामे करावी लागतील. घाईघाईत घेतलेला एखादा निर्णय नुकसानदायी होऊ शकतो. हा महिना आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी नवीन विषयांची निवड करू शकतात. त्याचा त्यांना फायदा होईल. आपली प्रकृती चांगली राहील. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

02-06-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण एकादशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 15:52 to 17:31

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:21 to 17:9

राहूकाळ : 17:31 to 19:10