lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-Jun-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

हा महिना आपल्यासाठी एखादी खुशखबर घेऊन येऊ शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील काही समस्यांमुळे त्रासलेले दिसतील. आपल्या कुटुंबात वाढत जाणाऱ्या तणावामुळे आपल्या कामात कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून स्वतः वेळ काढून व कुटुंबियांसह बसून समस्यांचे निराकरण करा. हा महिना आपल्या प्रेमिकेसाठी आव्हानात्मक आहे. अनेकदा एकमेकांची भेट होणे शक्य होणार नाही व त्यामुळे बेचैनी वाढेल. परंतु, आपल्या नात्यावर व प्रेमिकेवर विश्वास ठेवल्यास सर्व समस्या दूर होतील. आपला व्यापारातील फायदा वाढेल. प्राप्तीत वाढ होऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपण जर नोकरी करत असाल व त्यात सुद्धा आपली सरकारी नोकरी असेल तर ह्या महिन्यात आपणास पदोन्नती व सरकारी लाभ मिळू शकतो. सर्व सामान्य नोकरी करणाऱ्यांची सुद्धा पगारवाढ संभवते. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आपली सामाजिक कक्षा रुंदावेल. आपण एखादा प्रवास सुद्धा कराल. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल व त्याचा त्यांना लाभ सुद्धा मिळेल. उत्तम कामगिरीच्या जोरावर ते विषयांवरील पकड घट्ट करतील. प्रकृती उत्तम राहील. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

02-06-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण एकादशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 15:52 to 17:31

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:21 to 17:9

राहूकाळ : 17:31 to 19:10