IPL 2018ः नऊ खेळाडूंच्या नाकी नऊ; दुखापतीमुळे आयपीएलमधून 'आऊट'

आयपीएल 11च्या पर्वाला 7 एप्रिलपासून सुरुवात झाली. सर्वच संघ आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी कसोशीनं खेळतायत. परंतु या आयपीएलच्या पर्वात 9 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कोल्टर नाइलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं खरेदी केलं होतं. नाथनला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पेट कमिन्सलाही मुंबई इंडियन्सनं 5.4 कोटी रुपयांना विकत घेतलं. परंतु कमिन्सला आघात झाल्यानं तो गोलंदाजी करू शकत नाही.

कसिगो रबाडाला दिल्ली डेअरडेविल्सनं 4.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. पण दुखापतीमुळे अद्यापही तो दिल्लीकडून मॅच खेळू शकलेला नाही.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कलाही कोलकाता नाइट रायडर्सनं खरेदी केलं. परंतु शारीरिक अस्वास्थ्यामुळे तो संघाला वेळ देऊ शकला नाही.

चेन्नई सुपरकिंग्जनंही केदार जाधवला 7.8 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मात्र जाधवला जखम झाल्यानं सामन्यातून बाहेर पडावं लागलं.

मिचेल सेंटनर आयपीएल 11च्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्जचा भाग आहेत. दुखापतीमुळे तो सामन्याच्या बाहेर आहे.

जेसन बेहरेनडोर्फ दुखापतीमुळे आयपीएल 11च्या पर्वातून बाहेर आहे, मुंबई इंडियन्सनं त्यांना 1.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

कमलेश नागरकोटीही कोलकाता नाइट रायडर्सकडून तीन सामने खेळला. परंतु दुखापतीमुळे तो सध्या बाहेर आहे.

अफगाणिस्तानचा स्पिनर जहीर खानही आयपीएल 11च्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. त्यानं टीमसाठी फक्त एकच सामना खेळलाय.