कहानी घर घर की! यशस्वी होताच 'अशी' बदलली क्रिकेटपटूंची घरं

एम. एस. धोनी: धोनीचा समावेश जगातील सर्वात धनाढ्य क्रिकेटपटूंमध्ये होतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या धोनीनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. याचा धोनीला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाला. कधीकाळी साध्या घरात राहणारा धोनी आज रांचीतील एका आलिशान घरात राहतो. धोनीचं हे घर एखाद्या महालासारखं आहे.

विराट कोहली: भारताचा हा कर्णधार मैदानावर धावांचा पाऊस पाडत असताना त्याच्या अंगणात पैशांचा पाऊस पडतो आहे, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. सध्या विराट त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्कासोबत वर्सोव्यातील एका आलिशान घरात आहे. याशिवाय त्यानं दिल्लीत कुटुंबासाठी एक सुंदर घर खरेदी केलं आहे. या घरात अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत.

सुरेश रैना: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये जन्मलेल्या सुरेश रैनाचं सुरुवातीचं आयुष्य अतिशय संघर्षात गेलं. सुरेश रैना सरावासाठी लोकल ट्रेननं मैदानात जायचा. मात्र भारतीय संघात संधी मिळाल्यावर सुरेश रैनाचं आयुष्यच बदललं. सध्या रैना वास्तव्यास असलेलं घर एखाद्या राजवाड्यासारखं आहे.

सचिन तेंडुलकर: लहानपणी बांद्र्यातील एका छोट्या घरात राहणारा सचिन तेंडुलकर आज एका आलिशान बंगल्यात राहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर सचिननं हा बंगला खरेदी केला होता.

रविंद्र जाडेजा: भारतीय संघातील या अष्टपैलू खेळाडूनं काही दिवसांपूर्वीच नवं घर खरेदी केलं. जाडेजाचं बालपण अतिशय कष्टात गेलं. मात्र कठोर संघर्ष करत जाडेजानं क्रिकेटच्या मैदानात नेत्रदीपक यश मिळवलं.