कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून समोर आले आहेत.

बीसीसीआय रवी शास्त्रींना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिक मानधन देत असल्याचं वृत्त CricInfo या वेबसाइटनं दिलं आहे.

शास्त्रींनंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेमन यांना वर्षाकाठी 3 कोटी 57 लाख रुपयांहून अधिक मानधन मिळतं.

विशेष म्हणजे रवी शास्त्रींना मिळणारं हे मानधन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मानधनापेक्षाही जास्त आहे.

विराट कोहली वर्षभरात 6 कोटी 50 लाख रुपये कमवतो.