'द वॉल' म्हणून प्रसिद्ध राहुल द्रविडचा आज वाढदिवस

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडचा आज वाढदिवस आहे. 11 जानेवारी 1973 ला इंदोरमध्ये द्रविडचा जन्म झाला.

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. 16 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर मार्च 2012 मध्ये द्रविडने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

2005 मध्ये राहुल द्रविडला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण 2007 मध्ये त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ खेळण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे त्याला 'द वॉल' अशी उपाधी देण्यात आली होती. राहुल द्रविडला अर्जूना, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरनंतर राहुल द्रविड तिसरा फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजाराहून जास्त धावा केल्या आहेत. तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो जगातील सहावा आणि भारतातील तिसरा खेळाडू ठरला होता.

राहुल द्रविड एकमेव खेळाडू आहे ज्याने कसोटी खेळणा-या सर्व 10 देशांविरोधात शतक केलं आहे.

182 झेल घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावे आहे.