रहाणे, इशांत यांचा पर्यायी सराव सत्रात सहभाग

केपटाऊन येथे पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात संधी न मिळालेले अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पर्यायी सराव सत्रात सहभाग घेतला होता.

या तिघांबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलनेही या छोट्या सराव सत्रात सहभाग नोंदवला होता

९० मिनिटाच्या या सराव सत्रात भारताचे सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही उपस्थित होते. भारतीय

भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता. या सामन्यात उपकर्णधार असूनही रहाणेला संघाबाहेर बसावे लागले होते त्यामुळे संघ व्यवस्थापनेवर टीका देखील करण्यात आली होती.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना सेन्चुरियनला 13 जानेवारीपासून होणार आहे.