IND VS NZ: आशा-निराशाच्या हिंदोळ्यावर, 'तस्वीर बोलती है'...

विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज खेळी करणारा रोहीत शर्मा, उपांत्य फेरीत केवळ 1 धाव काढून बाद झाला. याच दु:ख मैदानावरुन तंबूत परतताना तो लपवू शकला नाही

उपांत्य सामन्यात चौकार पाहण्यासाठी ताटकळलेल्या भारतीय प्रेक्षकांना जेव्हा रविंद्र जडेजाने षटकार ठोकून आनंद दिला

भारताला सामना जिंकून देण्यासाठी शेवटपर्यंत संयमी खेळी करणारा धोनी रनआऊट होताच भारत विश्वचषक स्पर्धेतून आऊट झाला

महेंद्रसिंह धोनी धावबाद झाला अन् थर्ड अंपायरचा कौल देण्यापूर्वी पंचाच्याही चेहऱ्यावर ओहsssss अशी भावमुद्रा दिसून आली.

महेंद्रसिंह धोनी धावबाद होत झाला अन् थर्ड अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वी प्रेक्षकांनी देवाचा धावा सुरू केला

धोनी आऊट गेला अन् भारताना सामना गमावला, भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर... नक्कीच ही वेदना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणणारीच होती

जडेजान सामना सर करण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटच्या क्षणी फटका मारताना जडेजा बाद झाला तर धोनीही धावबाद झाला. त्यानंतर, विजयाच्या आशा सोडून हताश झालेला सुपरफॅन सुधीर

मैदानात जरी टीम इंडियाचे अकरा खेळाडू खेळत असतील, तरी 125 कोटी भारतीयांचं थेट कनेक्शन खेळाडूंशी असतं. म्हणूनच त्यांच्या आनंदात सुख तर दु:खात दु:खही लपलेलं असतं

क्रिकेट हा चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडीचा खेळ आहे, त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन क्रिकेटवेडे भारतीय क्रिकेटचा आनंद घेतात. मग ते लहान असो वा थोर

टीम इंडियाचा शेवट कोट्यवधी भारतीयांची निराशा करणार ठरला. मात्र, खिलाडूवृत्तीने भारतानेही पराभव मान्य केला, तर भारतीय संघाच्या खेळीच विराट कौतुकही न्यूझीलंडच्या कर्णधारानं कोहलीची पाठ थोपटून केलं, आखीर तस्वीर बोलती है....

भारताच्या विराट पराभवाचं दु:ख कुणाला झालं नाही, क्रिकेटचा देवही भावूक झाला, रोहीतही रडला, विराट निराश झाला तर धोनीही आतुन रडला