मोहम्मद शमीचे जलद शतक!

जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने बुधवारी विक्रमी कामगिरी केली

त्याने सर्वात जलद 100 विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला.

शमीने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्टिन गुप्तीलचा त्रिफळा उडवला.

पुढच्याच षटकात त्याने कॉलीन मुन्रोला बाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिले.

शमीने 56 सामन्यांत ही कामगिरी केली आणि इरफान पठाणचा ( 59 सामने) विक्रम मोडला.

या क्रमवारीत झहीर खान ( 65 ), अजित आगरकर ( 67 ) आणि जावगल श्रीनाथ ( 68 ) हे अव्वल पाचमध्ये येतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानच्या नावावर सर्वात जलद शंभर विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 44 सामन्यांत हा पराक्रम केला.

शमीने या यादित सहावे स्थान पटकावत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टशी बरोबरी केली.