हे दिग्गज फलंदाज यावर्षी ठरले अपयशी, नावं वाचून बसेल धक्का

.2017 मध्ये गेल पूर्णपणे अपशी ठरला...वर्षभरात गेल सहा वन-डे सामने खेळला..यामध्ये त्यानं फक्त 199 धावा केल्या. तर दोन टी-20 सामन्यामध्ये त्याला फक्त 58 धावांच करता आल्या.

न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने यावर्षी खेळलेल्या चार टी-20 सामन्यात एका अर्धशतकासह फक्त 94 धावा केल्या. तर पाच वन-डेमध्ये त्याला फक्त 62 धावाच करता आल्या. यादरम्यानं त्यानं पाच विकेटही घेतल्या. गेल्या काही वर्षातील आणि 2017तील कामगिरी पाहता कोरी अँडरसन या वर्षी आपली कामगिरी चोख बजावू शकला नाही.

मॅक्सवेलनं यावर्षी चार कसोटीतील आठ डावांत फलंदाजी करताना एका शतकासह 259 धावा तर गोलंदाजी करताना फक्त एक विकेट घेता आली. 13 वन-डेतीस 10 डावात फलंदाजी करताना दोन अर्धशतकासह 272 धावा केल्या. तर गोलंदाजी कराताना त्याला एकही बळी मिळवता आला

न्यूझीलंडच्या या अनुभवी खेळाडूचं हे वर्ष अतिशय खराब गेलं. ग्रँट एलियटनं यावर्षी एकही वन-डे सामना खेळाला नाही. खराब कामगिरीमुळे त्याची न्यूझीलंडच्या संघात संधीच दिली नाही. एककाळ तो संघाचा भरवशाचा खेळाडू होता.

पाकिस्तानच्या अनुभवी कामरान अकमलला या वर्षी संघर्ष करावा लागला. त्याला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. चार टी-20 सामन्यात त्याला फक्त 90 धावा करता आल्या. तर तीन वन-डेत फक्त 68 धावा करता आल्या.

पांडेनं 2017 मध्ये 10 वन-डेती 8 डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकासह फक्त 171 धावा काढल्या आहेत. पांडेला भारतीय संघात सुरैश रैनाच्या जागेवर खेळवलं जातंय पण त्याला तशी कामगिरी करता येत नाही. वन-डे प्रमाणंच त्यानं टी-20मध्ये फारशी चमक दाखवली नाही.

2017मध्ये रैना 20 वन-डेत फलंदाजी करताना एक शतक आणि चार अर्धशतकासह 517 धावा काढल्यात. तर तीन टी-20मध्ये एका अर्धशतकासह 100 धावा काढल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या आक्रमक डावखुरा फलंदाज युवराज सिंगसाठी 2017 हे वर्ष फारसं चांगल गेलं नाही. वर्षभरात युवराजला फक्त 11 वन-डे सामनं खेळता आले. यामधील 10 डावांत फलंदाजी करताना त्यानं एक शतक आणि एका अर्धशतकासह 372 धावा केल्या आहेत. 2017 मध्ये युवराज खेळलेल्या तीन टी-20 सामन्यात सपशेल अपयशी ठरला आहे.