IPL 2019 : विराट कोहलीच्या नावावर अजूनही कायम आहेत 'हे' विक्रम

1. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5371धावा कोहलीच्या नावावर आहेत.

2. एका मोसमामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 2016 साली सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या.

3. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. कोहली आणि एबी यांनी 2016 साली 229 धावांची भागीदारी रचली होती.

4. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये दोनशे धावांपेक्षा जास्त भागीदारी रचण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आतापर्यंत तीन वेळा दोनशे धावांपेक्षा जास्त धावांच्या भागीदाऱ्या केल्या आहेत.

यंदाचा हंगाम मात्र कोहलीला गाजवता आला नाही.