IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी ' हे ' पाच खेळाडू ठरू शकतात पर्याय

मार्टिन गप्तिल : न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलच्या नावावर सध्याच्या घडीला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. गप्तिल 2016 आणि 2017 या वर्षांमध्ये आयपीएल खेळला होता. आयपीएलमधील 10 सामन्यांमध्ये त्याने 132.16च्या स्ट्राइक रेटने 189 धावा केल्या आहेत.

इयॉन मॉर्गन : इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने आतापर्यंत 72 सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो खेळला आहे.

लेंडल सिमन्स : वेस्टइंडीजच्या लेंडल सिमन्सने देशाकडून 45 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. आतापर्यंत 29 आयपीएल सामन्यांचा अनुभव सिमन्सच्या पाठीशी आहे.

टॉम लॅथम : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 59 ट्वेन्टी-20 सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. फलंदाजीबरोबरच तो यष्टीरक्षणही करू शकतो, पण आयपीएलचा अनुभव मात्र त्याला नाही.

कुशल परेरा : श्रीलंकेच्या कुशल परेराने निदाहास ट्रॉफीतील चार सामन्यांमध्ये तीन अर्धशतके लगावली होती. यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा त्याला अनुभव आहे.