शतकवीर शेहजादने घेतली होती उत्तेजक द्रव्यं, पण...

भारताविरुद्ध शेहझादने 124 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

शेहझादने यावेळी शाहिद आफ्रीदीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. एका सामन्यात आफ्रिदीने 102 धावा केल्या तेव्हा संघाच्या 131 धावा झाल्या होत्या. या सामन्यात अफगाणिस्तानच्या 131 धावा झाल्या त्यामध्ये शेहझादच्या 103 धावा होत्या.

शेहझादने 2009 साली नेदरलँड्सविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते.

एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे पाचवे आणि भारताविरुद्धचे पहिले शतक ठरले आहे.

शेहझाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. त्यानंतर 2018 साली त्याने संघात पुनरागमन केले होते.