'या' क्रिकेटपटूंना कोहलीसोबत मिळाली संधी; पण कारकीर्द ठरली अल्पायुषी

मनोज तिवारीनं कोहलीसोबतच संघात पदार्पण केलं होतं. बंगालमध्ये छोटा दादा म्हणून ओळखला जाणारा हा क्रिकेटपटू आता फारसा कुणाच्याही लक्षात नाही. मनोज तिवारीनं 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलं. मात्र तो अपयशी ठरला. 2011 मध्ये त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळाली. त्यावेळी त्यानं शतक झळकावलं होतं. मात्र त्यानंतर त्याला फार संधी मिळाली नाही. मधल्या फळीत मोठी स्पर्धा असल्यानं मनोज तिवारी मागे पडला.

युसूफ पठाण टी-20 विश्वचषक विजेत्या संघात होता. यानंतर त्याला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघात संधी मिळाली. 2008 मध्ये त्याला भारताच्या एकदिवसीय संघात संधी मिळाली. 2008 ते 2012 या कालावधीत तो संघात दिसला. मात्र कामगिरीत सातत्य नसल्यानं त्याला संघातील स्थान राखता आलं नाही.

मनप्रीत गोनी चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय संघातदेखील स्थान मिळालं. 2008 मध्ये झालेल्या आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध त्यानं पदार्पण केलं. मात्र कामगिरी फारशी चमकदार नसल्यानं त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्पायुषी ठरली.

प्रग्यान ओझानं 2008 मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2010 ते 2013 या कालावधीत त्यानं कसोटीत 100 विकेट्स घेतल्या. मात्र आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजासा झुकतं माप दिलं गेल्यानं ओझाला फारशी संधी मिळाली.

सुब्रमण्यम बद्रिनाथनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. संघात फारशी संधी मिळत नसल्यानं बद्रिनाथ कंटाळला. बद्रिनाथला संघात योग्यवेळी संधी मिळाली नाही. बद्रिनाथ भारताकडून तिन्ही प्रकारात खेळला. श्रीलंकेविरुद्ध कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच मालिकेतून बद्रिनाथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. मात्र फारशी चमकदार कामगिरी करता न आल्यानं त्याला संघातील स्थान टिकवता आलं नाही.