विनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 07:52 AM2018-04-26T07:52:39+5:302018-04-26T13:22:39+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा ...

Why was Big Boss apologizing for Vineet Bhonde? | विनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ?

विनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ?

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते. पहिल्या दिवसापासून विनीत भोंडेला त्याचा माईक विसरण्याची सवय आहे. इतकेच नव्हे तर कॅप्टनसीच्या दरम्यान देखील त्याची ही सवय गेली नाही. याच कारणामुळे तो आता बिग बोसच्या शिक्षेस पात्र ठरणार आहे. विनीतच्या या बेफिकीर स्वभावावर घरतल्या इतर मंडळींनी देखील बऱ्याचदा आक्षेप घेतल्याचे दिसून आले आहे. 

बिग बॉसच्या आदेशानुसार विनीत भोंडेला गार्डन एरियामध्ये बसून “बिग बॉस मला माफ करा” असे त्याला पाटीवर लिहीहायचे आहे बिग बॉसचा पुढचा आदेश मिळे पर्यंत. विनीतच्या या स्वभावामुळे घराचा कॅप्टन आस्ताद काळेने त्याच्यावर नाराजगी व्यक्त केली. आपण त्याचे पालक नाही असे देखील तो म्हणाला.

काही दिवसांपूर्वीच विनीतच्या डोक्यात कॅप्टनसीची हवा गेली होती. बिग बॉसच्या घरातील पहिला पहिला कॅप्टन होण्याचा मान विनीत भोंडेला मिळाला होता. बिग बॉस मराठीच्या घराचा पहिला कॅप्टन झाल्यानंतर विनीतच्या बोलण्यामध्ये आलेला फरक घरातील सदस्यांना खटकला होता. विनीत भोंडेला वारंवार आस्ताद काळे आणि राजेश शृंगारपुरे यांनी त्याच्या वागणुकीमध्ये लवकरात लवकर बदल कर असा समजदेखील दिला होता.  विनीतच्या बोलण्यात एक प्रकारची गुर्मी आल्याचे सगळ्यांना जाणवली होती.  उषाजींनी विनीतला वारंवार होत्या  कि त्याने आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर सयंम ठेवण्याची गरज आहे.    

Web Title: Why was Big Boss apologizing for Vineet Bhonde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.