'शक्ति अस्तित्व के एहसास'मध्ये शूट केले रोमाँटिक गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:29 AM2018-07-30T10:29:39+5:302018-07-30T10:50:28+5:30

कलर्सच्या शक्ति अस्तित्व के एहसास की मधील सौम्या (रुबिना दिलैक) आणि हरमन (विवियन देसना) यांच्यातील रोमान्स फुलू लागला आहे.

Romantic song shot in 'Shakti Astitva Ke Ehsaas Ki' | 'शक्ति अस्तित्व के एहसास'मध्ये शूट केले रोमाँटिक गाणं

'शक्ति अस्तित्व के एहसास'मध्ये शूट केले रोमाँटिक गाणं

googlenewsNext
ठळक मुद्दे 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिका त्याच्या हटके कथानकामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे

कलर्सच्या 'शक्ति अस्तित्व के एहसास'की मधील सौम्या (रुबिना दिलैक) आणि हरमन (विवियन देसना) यांच्यातील रोमान्स फुलू लागला आहे. नुकतेच या दोघांनी आगामी एपिसोड साठी चित्रीकरण केले ज्यात ते रोमँटिक डान्स सिक्वेन्स सादर करताना दिसणार आहेत. धूम या सिनेमातील दिल बोले चिक धूम या गाण्यावर ते दोघे नृत्य करताना दिसत होते. या गाण्यात सिनेमात दर्शवल्या गेलेल्या भावनांप्रमाणे शोच्या निर्मात्यांनी सौम्या आणि हरमन एकमेकांकडे आकर्षित होताना दाखविले आहे. शो मधील उत्कृष्ट नृत्यासाठी नावाजल्या गेलेल्या रुबिनाने या गाण्याची कोरियोग्राफी स्वतः केली आहे.

सिक्वेन्स विषयी बोलताना, रुबिना दिलैक म्हणाली, “ मला नृत्य करणे अतिशय आवडते आणि माझ्या सहकलाकारांना ते माहित आहे. यावेळी दिल बोले चिक धूम या गाण्यावरील रोमँटिक डान्स सिक्वेन्सची कोरियोग्राफी करण्याची संधी क्रिएटिव्हनी मला दिली. या सिक्वेन्सचे चित्रीकरण करताना कूप मजा आली आणि ही संधी मला देण्यासाठी मी माझ्या टीमचे आभार मानते. माझी इच्छा आहे की असेच अनेक सिक्वेन्स यावेत ज्यांची मी कोरियोग्राफी करेन. मला आशा आहे की प्रेक्षकांना ते आवडेल.

सामाजिक नियमांशी लढणाऱ्या आणि किन्नरांना जीवनात आदर मिळेल अशी आशा फुलवणारा 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिका त्याच्या हटके कथानकामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. सौम्या आणि हरमन यांच्या प्रमुख भूमिका करणाऱ्या लाडक्या रुबिना दिलाइक आणि विवियन देसना यांच्या भूमिकांना वेगवेगळे वळण देणारी ही मालिका नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

Web Title: Romantic song shot in 'Shakti Astitva Ke Ehsaas Ki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.