बिग बॉसच्या घरात ऋतुजा धर्माधिकारी झाली नाराज तर राजेश शृंगारपूरेला झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 06:25 AM2018-05-12T06:25:33+5:302018-05-12T11:55:33+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा सदस्यांना लक्झरी बजेट मिळणार आहे. सगळ्या सदस्यांनी बिग ...

Rituja Dharmadhikari became angry at the Big Boss house and Rajesh went to Shringarpur to tears | बिग बॉसच्या घरात ऋतुजा धर्माधिकारी झाली नाराज तर राजेश शृंगारपूरेला झाले अश्रू अनावर

बिग बॉसच्या घरात ऋतुजा धर्माधिकारी झाली नाराज तर राजेश शृंगारपूरेला झाले अश्रू अनावर

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा सदस्यांना लक्झरी बजेट मिळणार आहे. सगळ्या सदस्यांनी बिग बॉसने दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडले. त्यामुळे घरातील सगळे रहिवाशी यास पात्र आहेत असे बिग बॉसचे म्हणणे असणार आहे. बजेट मिळाले असले तरी अनेक गोष्टींमुळे घरात वाद रंगणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये मेघा आणि सई यांची घनिष्ट मैत्री झालेली आहे. परंतु या आठवड्यातील टास्कमुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये मतभेद होत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर पुष्कर देखील सईशी सहमत आहे. त्यामुळे आता मेघाच्या बाजूने असणारे सदस्य सुद्धा तिची साथ सोडतील की तिला समजून घेतील हे पाहाणे रंजक असणार आहे.
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीचा टास्क रंगला होता. कच्ची अंडी, ग्रास कटर–कारले, शेण आणि केक या गोष्टी टास्कसाठी सदस्यांना देण्यात आल्या. घरच्याच सदस्यांनी बाकीच्या सदस्यांना वेगळी वेगळी आव्हानं दिली. ज्यात काहींना यश तर काहींना अपयश आले. यामध्ये देखील टास्क दरम्यान दोन गट होते. ज्यामध्ये भूषण कडू १२ कच्ची अंडी खाण्यात यशस्वी ठरला, अनिल थत्ते यांनी साडे तीन पोळ्या पाणी न पिता खाल्या, सईला मात्र एका मिनिटामध्ये शेणाचे ८५ गोळे बनवता आले नाही. मेघाने कच्ची अंडी भांड्यामध्ये फोडली. सदस्यांना अनेक अडचणी आल्या असल्या तरी त्यांनी हे टास्क पूर्ण केले. कॅप्टनसीच्या उमदेवार असलेल्या स्मिता आणि पुष्कर यांमध्ये कॅप्टन कोण होणार यावरून ही चांगलीच चुरस रंगली होती. ज्यामध्ये शेवटी स्मिताची टीम जिंकली आणि स्मिता बिग बॉस मराठीच्या घरातील नवी कॅप्टन बनली. कॅप्टनसीसाठी काल सदस्यांमध्ये रंगलेली ही चुरस बघायला मज्जा नक्कीच आली. परंतु ऋतुजाला कॅप्टनसीसाठी घरातील सदस्यांनी संधी न दिल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली.
मेघा आणि सई मध्ये सुरू असलेला वाद प्रेक्षकांना आज देखील बघायला मिळणार आहे. तसेच राजेशला सिक्रेट रूम मध्ये रडू येणार आहे. त्याला घरच्यांची आठवण येत असल्याने बाहेर जाऊ द्या अशी मागणी तो बिग बॉसकडे करणार आहे. या खोलीत नाही राहावत अशी घुसमट तो व्यक्त करणार आहे. आता बिग बॉस राजेशचे हे मनोगत ऐकून कुठला निर्णय घेतील? हे लवकरच पाहायला मिळेल. 

Also Read : ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश

Web Title: Rituja Dharmadhikari became angry at the Big Boss house and Rajesh went to Shringarpur to tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.