‘रात्रीस खेळ चाले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:52 PM2018-12-31T17:52:35+5:302018-12-31T18:04:12+5:30

झी मराठीवरील  ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

ratris khel chale' soon to meet the audience | ‘रात्रीस खेळ चाले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘रात्रीस खेळ चाले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्दे कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले

झी मराठीवरील  ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आलेले 'कानाला खडा' आणि 'झिंग झिंग झिंगाट' प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.

याआधी देखील झी मराठीने प्रेक्षकांसाठी अनेक अविस्मरणीय मालिका सादर केल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले होते. या मालिकेतला नाईकांचा वाडा पाहायला आजही लोकांची गर्दी होत असते. कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर म्हणजे ही मालिके आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या रहस्यमय म्युझिकवर एक गूढ टिझर प्रदर्शित केला आहे. तसेच हा टिझर झी मराठीच्या सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिघेला पोहोचली आहे. हि मालिका १४ जानेवारी पासून  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काय असेल भीतीचं नवं रूप? काय असेल वाड्यात दडलेलं नवं गूढ? नवीन पात्र पाहायला मिळतील कि असेल जुन्या पात्रांची नवीन गोष्ट? आता उलगडणार वाड्यातील रहस्यमय घटनांचं गूढ.

Web Title: ratris khel chale' soon to meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.