KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या बिनीता जैन, पण 7 करोड जिंकण्याचे होणार का स्वप्न पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:46 PM2018-09-27T12:46:36+5:302018-09-27T12:51:03+5:30

कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.

KBC 10: Binita Jain became the first crorepati of this season | KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या बिनीता जैन, पण 7 करोड जिंकण्याचे होणार का स्वप्न पूर्ण?

KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या बिनीता जैन, पण 7 करोड जिंकण्याचे होणार का स्वप्न पूर्ण?

googlenewsNext

प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. 

अगदी त्याचप्रमाणे 'कौन बनेगा करोडपती'चा यंदाचा पहिला करोडपतीही मिळाला आहे. होय, यंदाच्या सिझनच्या करोडपतीचे नाव बिनीता जैन असे आहे. बिनीता जैन या गुवाहाटी, आसाम येथील आहेत. नुकतेच या भागाचे प्रोमी टीव्हीवर झळकतायेत. या प्रोमोमध्ये बिनीता जैन 1 कोटीच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देताना दाखवण्यात आले आहे. पुढे  त्यांच्या समोर थेट येतो 7 कोटीचा प्रश्न. आता या प्रश्नाचे योग्य उत्तर बिनीता जैन देतात का हे ही पाहणे रंजक ठरणार आहे.


छोटा पडदा म्हटला की, टीआरपीचे गणित हे असते. कौन बनेगा करोडपतीच्या टीआरपी बाबत तुम्हाला किती टेन्शन येते असे विचारले असता बिग बी यांनी सांगितेले की,कार्यक्रमाचा टीआरपी कसा मोजतात हेच मला माहित नाहीये. मी त्याचा कधी अभ्यास केलेला नाहीये. मी कौन बनेगा करोडपतीचे चित्रीकरण मनापासून करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप साऱ्या लोकांना भेटता येते, त्यांचे आयुष्य जाणून घेता येते. हा अनुभव खूपच छान असतो. मी एकदा चित्रीकरण केले की, टीआरपी आला की नाही याचा विचार करत नाही. एक कलाकार म्हणून आपण आपले काम करावे असे मला वाटते. टीआरपीचे टेन्शन घेऊ नये.

Web Title: KBC 10: Binita Jain became the first crorepati of this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.