इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या सेटवरून चिडून हुमा कुरेशी पडली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 11:21 AM2018-08-09T11:21:02+5:302018-08-09T11:27:59+5:30

झी टीव्हीवरील इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ ह्या भारतातील अग्रगण्य अभिनयावर आधारित रिॲलिटी शो आपल्या उत्तम अभिनय क्षमता, मनोरंजक ॲक्ट्‌स आणि ड्रामेबाझीसह प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे.

Huma Qureshi storms out of the sets of India’s Best Dramebaaz | इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या सेटवरून चिडून हुमा कुरेशी पडली बाहेर

इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या सेटवरून चिडून हुमा कुरेशी पडली बाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देशांतनु महेश्वरी आणि विघ्नेश पांडे यांची धम्माल प्रेक्षकांना निश्चितपणे आवडली आहेमात्र शोदरम्यान हुमा चिडून निघून गेली.

झी टीव्हीवरील इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ ह्या भारतातील अग्रगण्य अभिनयावर आधारित रिॲलिटी शो आपल्या उत्तम अभिनय क्षमता, मनोरंजक ॲक्ट्‌स आणि ड्रामेबाझीसह प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे. यातील गोड लिटल ड्रामेबाझची निरागसता, खोडकर स्वभाव आणि अभिनय कौशल्य, परीक्षक हुमा कुरेशी, विवेक ओबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्यातील मस्त केमिस्ट्री आणि सूत्रधार शांतनु महेश्वरी आणि विघ्नेश पांडे यांची धम्माल प्रेक्षकांना निश्चितपणे आवडली आहे.

शांतनु महेश्वरीचा फ्लर्टपणा आणि सर्वांच्या खोड्‌या काढण्याची सवय यांमुळे ह्या शोमध्ये कायमच काही ना काही गंमती जमती होत असतात. त्याचे विनोद आणि खोड्‌या अनेक हुमालाच सहन करावे लागतात. ह्यावेळेस शंतनुला तिचा चित्रपट ‘एक थी डायन’ आवडला. तो म्हणाला, “मी एक थी डायन ५० वेळा फक्त तुझ्यासाठी पाहिला. तू त्या चित्रपटात अतिशय सुंदर आणि अगदी डायन दिसत होतीस.” हे ऐकून इतर वेळेस अगदी शांत दिसणाऱ्या हुमाने हे बोलणे मात्र सहजपणे घेतले नाही आणि ती चक्क सेटवरून निघूनच गेली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

हे पाहताच विवेकने मध्यस्थी केली आणि त्याने शांतनुला विनंती केली की त्याने आपले बोलणे मागे घ्यावे आणि त्वरित माफी मागावी. एवढेच नाही तर ओमंग हुमाच्या मागे तिला मनवण्यासाठी तिच्या व्हॅनिटीपर्यंत गेला पण त्यांचे सगळेच प्रयत्न व्यर्थ गेले. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा शांतनु अधिकाधिक चिंता होऊ लागला. पण थोड्‌याच वेळात हुमा हसतहसत परतली आणि शांतनुच्या जवळजवळ घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून ओमंग आणि विवेक यांची हसूनहसून पुरेवाट झाली. आता त्याची खोडी त्याच्यावरच उलटली आहे हे समजायलासुद्धा त्याला काही क्षण लागले. फॉर ए चेंज शांतनुची मस्करी करण्यासाठी मेंटॉर्स ड्रामेबाझ बनले. अखेर आपल्या खोड्‌यांची चव शांतनुलासुद्धा चाखायला लागली.

Web Title: Huma Qureshi storms out of the sets of India’s Best Dramebaaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.