‘इश्कबाझ’मध्ये सुरभी चंदनाची दुहेरी भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:24 AM2018-02-05T11:24:09+5:302018-02-05T16:54:09+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ मालिकेने प्रसारणास प्रारंभ केल्यापासून प्रेक्षकांची मने काबीज केली आहेत. मालिकेतील  शिवायसिंह ओबेरॉय (नकुल मेहता) आणि अन्निका ...

In the 'flirtation' Surhti Chandana double role! | ‘इश्कबाझ’मध्ये सुरभी चंदनाची दुहेरी भूमिका!

‘इश्कबाझ’मध्ये सुरभी चंदनाची दुहेरी भूमिका!

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ मालिकेने प्रसारणास प्रारंभ केल्यापासून प्रेक्षकांची मने काबीज केली आहेत. मालिकेतील  शिवायसिंह ओबेरॉय (नकुल मेहता) आणि अन्निका (सुरभि चंदना) या जोडप्यातील प्रेम आणि सामंजस्याचे नाते हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. या मालिकेच्या विद्यमान कथाभागाला लवकरच एक जबरदस्त वळण लागणार आहे. शिवायसिंहला आपली पत्नी अन्निकाची गोळी मारून हत्या करतो, असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण इथे त्यांच्या प्रेमकथेचा अंत होत नाही; कारण आमच्या असे कानावर आले आहे की प्रेक्षकांना यापुढचा धक्का देण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. तो म्हणजे, सुरभि चंदनाला लवकरच दुहेरी भूमिकेत सादर केले जाणार आहे. दुहेरी भूमिकेत सुरभि अन्निकाचीच भूमिका साकारणार असून तिच्यासारखी दिसणारी दुसरी अन्निका ही मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच भिन्न असेल.

आपल्या या आगामी दुहेरी भूमिकेबद्दल सुरभि म्हणाली, “अन्निकाची प्रारंभीची भूमिका मला फार आवडायची, कारण त्यात ती सुंदर दिसत असली, तरी तिचा लहरी स्वभाव व्यक्त होत होता. आता ती अधिक प्रौढ झाली असून तिच्या लग्नानंतर ती अधिक परिपक्व दिसत होती. आता ही तिची हमशकल मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच विरोधी असेल. ही नवी अन्निका बरीचशी ‘जोश’ चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या व्यक्तिरेखेप्रमाणे असेल; मात्र तिच्या स्वभावात विनोदाचा भाग अधिक असेल.”


 

Web Title: In the 'flirtation' Surhti Chandana double role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.