Exclusive: ही असणार गॅरीची नवी शनाया,'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत होणार तिची ग्रँड एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:01 PM2018-08-31T13:01:36+5:302018-08-31T13:13:55+5:30

शनायाने या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे.

Exclusive: This will be Gary's new Shanaya, will make grand entry in maza navryachi bayko | Exclusive: ही असणार गॅरीची नवी शनाया,'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत होणार तिची ग्रँड एंट्री!

Exclusive: ही असणार गॅरीची नवी शनाया,'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत होणार तिची ग्रँड एंट्री!

छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. गेले वर्षभर रसिकांची आवडती मालिका म्हणून 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला पसंती मिळाली आहे.या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. राधिकाची भूमिका अनिता दाते आणि शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत आहे. शनाया या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावतो आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया भावते आहे. त्यामुळे आपली लाडकी अभिनेत्री शनाया आता या मालिकेत दिसणार नाही रसिका सुनील साकारणारी शनायानेही मालिका सोडल्यानंतर शनाया या भूमिकेत कोणाची वर्णी लागणार या तर्कवितर्कांना सध्या उधाण आले आहे.

एकीकडे शनायाने मालिका सोडल्याची बातमीमुळे तिचे चाहते थोडे नाराज असले तरीही दुसरीकडे एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत. ती म्हणजे 'जय मल्हार' मालिकेमुळे बानु बनत घराघरात पोहचलेली इशा केसकर  नवी शनाया बनत पुन्हा छोट्या पडद्यावर दमदार एंट्री करणार असल्याची माहिती मिळते आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत इशा केसकर बाईकवरून एंट्री मारत मालिकेत झळकणार आहे. येत्या 2 सप्टेंबरला डॅशिंग नवीन शनायाचे दर्शन मालिकेत घडणार आहे. या खास भागाचे 29 ऑगस्टलाच चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मिळते आहे.


 
शनायाने 'माझ्या नव-याची बायको' मालिकेला अलविदा केल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मालिकेला मिळणा-या ''टीआरपीचे आकडे बदलत राहतील मात्र रसिकांचे मिळणारे प्रेम असेच राहु द्या''. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी तिने  चाहत्यांसह संवाद साधत रहावा असेही चाहते तिला सुचवत आहेत.

Web Title: Exclusive: This will be Gary's new Shanaya, will make grand entry in maza navryachi bayko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.