Bigg Boss 12: ऐनवेळी 'टिकट टू फिनाले' मिळवलेली स्पर्धक सुरभी राणाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:10 PM2018-12-30T12:10:10+5:302018-12-30T12:22:01+5:30

'बिग बाॅस 12' फायनलमध्ये श्रीसंथ, दीपिका कक्कड, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी आणि दीपक ठाकुर यांच्यामध्ये अखेरचा भाग रंगणार आहे.

Bigg Boss 12: Shocking Eviction OF Surbhi Rana | Bigg Boss 12: ऐनवेळी 'टिकट टू फिनाले' मिळवलेली स्पर्धक सुरभी राणाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता

Bigg Boss 12: ऐनवेळी 'टिकट टू फिनाले' मिळवलेली स्पर्धक सुरभी राणाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता

googlenewsNext

सगळ्यात वादग्रस्त समजला जाणारा शो बिग बाॅसचे आज 30 डिसेंबरला 5 स्पर्धकांमध्ये  अखेरचे युद्ध रंगणार आहे.नियमानुसार प्रत्येक आठवड्याला एक स्पर्धक हा घराबाहेर पडतो. मात्र यावेळी यावेळी घरातून बाहेर जाण्यासाठी सुरभी राणाला नाॅमिनेट करण्यात आले. हे सा-यांसाठीच आश्चर्यचकीत ठरले आहे.विशेष म्हणजे सुरभी घरात वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट बनून आली होती.तिलाच आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.मात्र सुरभी राणाला अशा प्रकारे नाॅमिनेट केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर याविषयी नेटक-यांच्या संमिश्र प्रतिक्रीया पाहायला मिळत आहे. यावर यूजर्स कमेंट्स करत आपापली मते नोंदवताना दिसत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, सुरभीच्या ऐवजी दीपिका किंवा इतर कंटेस्ट बाहेर जायला हवे होते. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सुरभीला फायनल राऊंडमधून बाहेर काढणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

तुर्तास  फायनलमध्ये श्रीसंथ, दीपिका कक्कड, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी आणि दीपक ठाकुर यांच्यामध्ये अखेरचा भाग रंगणार आहे.यामध्ये कोण ठरणार 'बिग बाॅस 12' चा विजेचा हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर यंदाचे   'बिग बॉस 12' चे पर्वचा विजेताही फिक्त झाल्याचे चर्चा रंगत आहेत.  श्रीसंतलाच यंदाचा  विजेता घोषित करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.



 

यावर पत्नी भुवनेश्वरी श्रीसंतने नेटक-यांना सडेतोड उत्तरही दिले होते. तिने म्हटले होते की, बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांच्या चाहत्यांची असुरक्षितता पाहा. ते अफवा पसरवत आहेत. तुम्ही अफवा पसरवत राहा. कारण एखादी गोष्ट सतत बोललल्यानंतर ती सत्य होते असे मला वाटते. श्रीसंतने हाफ सिझनसाठी किंवा केवळ काही महिन्यांसाठी बिग बॉस हा कार्यक्रम साईन केला नव्हता. आपल्या इनसिक्युरिटीबाबत तुम्ही शांतच बसा...त्यामुळे जोपर्यंत विजेता घोषित होत नाही तोपर्यंत विजेत्याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात असल्याते पाहायला मिळत आहे.
 

Web Title: Bigg Boss 12: Shocking Eviction OF Surbhi Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.