'श्री लक्ष्मीनारायण' मालिकेतील अनुष्का सरकटेला ओळखलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:21 PM2019-05-29T13:21:33+5:302019-05-29T13:30:27+5:30

“श्री लक्ष्मीनारायण” मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुष्का सरकटे या लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे.

Anushka sarkate playing laxmi role in shree lakshmi narayan serial | 'श्री लक्ष्मीनारायण' मालिकेतील अनुष्का सरकटेला ओळखलात का?

'श्री लक्ष्मीनारायण' मालिकेतील अनुष्का सरकटेला ओळखलात का?

googlenewsNext
ठळक मुद्देअनुष्का सरकटे या लक्ष्मीची भूमिका साकारणार आहेरोशन विचारे विष्णूची भूमिका साकारणार आहे

“श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने भारतीय पुराण, संस्कृती, वेद, परंपरा याचा सखोल अभ्यास आणि संशोधन करून ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. लक्ष्मीची उत्पत्ती, लक्ष्मी नारायणाची भार्या कशी बनली, या सगळ्यामध्ये शिव आणि ब्रम्ह यांचे काय योगदान आहे, अशा विविध टप्प्यांवरून मालिकेचे कथासूत्र फुलत जाणार आहे. भव्यदिव्य सेट, सुरस कथा, दमदार अभिनय, यांनी नटलेल्या “श्री लक्ष्मी नारायण” या मालिकेचे क्रियेटीव्ह डायरेक्टर संतोष अयाचित असून निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे. 'श्री लक्ष्मीनारायण' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुष्का सरकटे या लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे तर रोशन विचारे विष्णूची भूमिका साकारणार आहे. 

“श्री लक्ष्मीनारायण” मालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौराणिक काळ प्रेक्षकांसमोर उभा करणे. पौराणिक कथेला साजेसा सेट, संवाद, कलाकारांच्या वेशभूषा इत्यादीद्वारे त्या काळाचे दर्शन करून देणं हे मोठं आव्हान असतं.

कारण या गोष्टी थेट वेद पुराणमध्ये उल्लेख केल्या गेलेल्या देवी देवतांच्या वर्णनाशी जोडल्या जातात आणि म्हणूनच मालिकेमध्ये अत्यंत बारकाईने अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. अगदी पुराणापासून कलयुगापर्यंत माणूस लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी झगडत आहे, ती “लक्ष्मी” मात्र जिथे विष्णूचा वास असतो तिथेच निवास करते. 

Web Title: Anushka sarkate playing laxmi role in shree lakshmi narayan serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.