‘कबाली’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘दि ग्रँड रेक्स चित्रपटगृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 07:55 AM2016-06-29T07:55:32+5:302016-06-29T13:25:32+5:30

            लई भारी अभिनेत्री राधिका आपटे सुपरस्टार रजनीकांत सरांसोबत ‘कबाली’ या तामिळ चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार ...

Screening of 'Kabali' movie 'The Grand Rex' | ‘कबाली’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘दि ग्रँड रेक्स चित्रपटगृहात

‘कबाली’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘दि ग्रँड रेक्स चित्रपटगृहात

googlenewsNext

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">
            लई भारी अभिनेत्री राधिका आपटे सुपरस्टार रजनीकांत सरांसोबत ‘कबाली’ या तामिळ चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे हे सर्वांनाच माहित आहे. ‘कबाली’ या चित्रपटाच्या संदर्भात अभिमानाची बाब ही आहे की, ‘कबाली’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘दि ग्रँड रेक्स’ या युरोपमधील सर्वात मोठ्या चित्रपटगृहात होणार आहे.

                

राधिका आपटे सुपरस्टार रजनीकांतसोबत ‘कबाली’ मध्ये-

‘दि ग्रँड रेक्स’ या चित्रपटगृहात २००० हून जास्त सीट्स आहेत आणि हा जगातला सर्वात मोठा सिनेमा हॉल आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग या चित्रपटगृहात झाले होते. आता ‘कबाली’ या  चित्रपटाचे स्क्रिनिंग येथे होणार ही आनंदाची गोष्ट आहे. 

या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड जगावर आधारित असून चित्रपटाचं शूटींग मलेशियामध्ये करण्यात आलं आहे. राधिका आपटे सतत वेगवेगळ्या पठडीतील, भाषेतील सिनेमे करते आता ‘कबाली’च्या माध्यमातून तामिळ चित्रपटात ती काम करत आहे आणि सुपरस्टार रजनीकांत परत एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला कूल एटिट्युडमध्ये सज्ज झाले आहेत.

भारतीय चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ‘दि ग्रँड रेक्स’ सारख्या मोठ्या सिनेमा हॉलची निवड करण्यात आली याचा सर्व भारतीयांना नक्कीच अभिमान आहे.

 

Web Title: Screening of 'Kabali' movie 'The Grand Rex'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.