पुष्कर जोगच्या ती & ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:23 AM2018-04-27T07:23:55+5:302018-04-27T12:53:55+5:30

जबरदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा पुष्कर जोग आपला नवा सिनेमा 'ती & ती' च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारीघडवण्यासाठी ...

Pushkar Jog's Tiara movie teaser poster just launched | पुष्कर जोगच्या ती & ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच

पुष्कर जोगच्या ती & ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच

googlenewsNext
रदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा पुष्कर जोग आपला नवा सिनेमा 'ती & ती' च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारीघडवण्यासाठी सज्ज झाला आहे.नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये "ती & ती" मध्येअडकलेला पुष्कर आपल्याला दिसतो.अभिनेत्याबरोबरच निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर आपल्या या निर्मितीविषयी बोलताना, "आपल्याला बाहेरगावी चित्रीत  होणा-याचित्रपटांची प्रचंड आवड  असल्याचं म्हणाला. पुढे बोलताना, "एक निर्माता म्हणून 'ती अँड ती' च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये दिसणारी श्रीमंती मराठीमध्येआणण्याचा प्रयत्न आपण केल्याचं त्याने स्पष्ट केलं." तर चित्रपटाची कथा खूप सुंदररित्या लिहिली गेली असून यात प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाचीभूमिका साकारताना धमाल आल्याचं म्हणत प्रेक्षकांना हा गोंधळ नक्की भावेल,असा विश्वास पुष्कर जोग यांनी दर्शवला आहे.

 

‘ती’ असताना ‘ती’च्या येण्याने गांगरलेल्या तरूणाची ही कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली असून मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शनकेलं आहे. गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया निर्मित या चित्रपटाची निर्मिती पुष्कर जोग आणि मोहन नाद्दर यांनी केली असून मोहित छाब्राया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर ती & तीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थनाबेहरे प्रमुख भूमिकेत आहेत.या तिघांभोवती फिरणारी ही कथा लवकरच आपल्या सगळ्यांना कन्फ्युज करायला येणार आहे.

Web Title: Pushkar Jog's Tiara movie teaser poster just launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.