प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलेटर’ आता गुजराती रंगभूमीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 11:41 AM2017-09-06T11:41:43+5:302017-09-06T17:11:43+5:30

व्हेंटिलेटर या सिनेमानं मराठी चित्रपट रसिकांची मनं जिंकली. अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या या सिनेमावर रसिकांसह समीक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव ...

Priyanka Chopra's ventilator is now Gujarati stage! | प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलेटर’ आता गुजराती रंगभूमीवर!

प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलेटर’ आता गुजराती रंगभूमीवर!

googlenewsNext
हेंटिलेटर या सिनेमानं मराठी चित्रपट रसिकांची मनं जिंकली. अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या या सिनेमावर रसिकांसह समीक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव केला. सुंदर कथा, त्याला राजेश म्हापुसकर यांचं लाभलेलं दिग्दर्शन आणि कलाकारांचा तितकाच दमदार तसंच सशक्त अभिनय यामुळे व्हेंटिलेट सिनेमानं रसिकांवर जादू केली. त्यामुळे व्हेंटिलेटर सिनेमानं विविध पुरस्कारतही बाजी मारली. इतकंच नाहीतर मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवरही व्हेंटिलेटरने छाप पाडली.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी या तीन गटातील राष्ट्रीय पुरस्कार व्हेंटिलेटर सिनेमानं आपल्या नावावर केले. आता मराठी रुपेरी पडदा गाजवणारा व्हेंटिलेटर सिनेमा आता रंगभूमीवर येणार आहे. हा सिनेमा आता गुजरात रंगभूमीवर नाटकरुपात दाखल होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश जोशी या सिनेमाचं गुजराती नाट्यरुपांतर करणार आहेत. राजेश जोशी यांचं 'कोडमंत्र' हे नाटक सध्या गुजरात रंगभूमीवर तुफान गाजत आहे.गुजराती नाट्य रसिकांची मनं जिंकणारं हे नाटक गुजराती रंगभूमीवरील सगळ्यात महागडं नाटक असल्याचं बोललं जात आहे. आता व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाचं नाट्य रुपांतर गुजराती रंगभूमीवर आणण्याचा निर्धार राजेश जोशी यांनी केला आहे. व्हेंटिलेटर सिनेमाचं गुजराती नाट्य रुपांतर होत असल्याबद्दल व्हेंटिलेटर सिनेमाची निर्माती प्रियांका चोप्राच्या आई डॉ. मधु चोप्रा यांनीही आनंद व्यक्त केला आहे. एखाद्या गाजलेल्या सिनेमाचं नाट्य रुपांतर होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.सिनेमानं राष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे, रसिकांची मनं जिंकली आहेत. आता तेच प्रेम गुजराती रसिकांकडून गुजराती रंगभूमीवरही मिळावं अशी अपेक्षा मधु चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.'व्हेंटिलेटर' सिनेमा नाट्य रुपांतर करुन रंगभूमीवर आणताना त्या सिनेमाच्या कथेत कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त गुजरात नाट्य रसिकांची आवड लक्षात घेऊन सिनेमाची कथा मांडण्याचा प्रयत्न राजेश जोशी करणार आहेत.यापैकी नाटकातील काही सीन्स पाहिल्याचे आणि ते योग्यरित्या मांडल्याचं मधु चोप्रा यांनी सांगितले आहे.व्हेंटिलेटर या मराठी सिनेमात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर आणि इतर तगडी स्टारकास्ट होती. या सिनेमानं राष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा उंचावला. आता या सिनेमाचं गुजराती नाट्यरुपांतर पाहण्यासाठी गुजराती नाट्य रसिकही नक्कीच आतुर असतील.
Also Read:अभिनयानंतर प्रियांका चोप्रा करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती!

Web Title: Priyanka Chopra's ventilator is now Gujarati stage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.