अभिनयापासून दूर जात हा अभिनेता करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, नैसर्गिक पद्धतीने शेती करत होते लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:47 PM2019-03-04T12:47:15+5:302019-03-04T12:49:05+5:30

कारने मराठीतील साम दाम दंड भेद, स्वप्न तुझे नि माझे, स सासूचा, अगम्य, संघर्षयात्रा या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो रुपेरी पडद्यापासून दूर होता. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या संघर्षयात्रा चित्रपटात त्याचे अखेरचं दर्शन झाले होते.

marathi actor omkar Karve left acting & doing organic farming for Income | अभिनयापासून दूर जात हा अभिनेता करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, नैसर्गिक पद्धतीने शेती करत होते लाखोंची कमाई

अभिनयापासून दूर जात हा अभिनेता करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, नैसर्गिक पद्धतीने शेती करत होते लाखोंची कमाई

googlenewsNext

नोकरी धंद्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण नोकरी तसंच कामाच्या शोधात गावातून शहरात येतात. मात्र शहरातली कामाचं तसंच पैसे कमावण्याचं चांगलं साधन सोडून कुणी गावात जाणारा व्यक्ती अपवादानंच पाहायला मिळतो. त्यातच एखादा व्यक्ती जो कायम ग्लॅमरच्या दुनियेत असतो त्याने काही हटके गोष्ट केली तर चर्चा तर होणारच. आजवर कलाकार मंडळी राजकारण किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना आपण पाहिलंय. मात्र चित्रपटसृष्टीतल्या एका कलाकाराने सिनेकारकीर्द सोडून चक्क काळ्या मातीची सेवा करण्याचे ठरवलं आणि ते यशस्वीरित्या करूनही दाखवलंय. या कलाकाराचे नाव आहे ओमकार कर्वे.

अभिनयापासून दूर जात नाशिक इथे तो आपल्या शेतात नैसर्गिक पद्धतीने शेती करतोय. आपल्या शेतात तो नैसर्गिक पद्धतीने विविध पिके घेतो. त्याने आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, कोबी, मुळा अशा विविध भाज्या आणि पिके घेतली आहेत. इतकंच नाही तर ती भाज्या आणि पिकं घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम ओमकारने सुरू केले आहे. यातून तो लाखो रुपयांची उलाढाल करतो आहे.

अनेक कलाकारांनी ओमकारच्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केले आहे. मुंबईतील त्याचे मित्रसुद्धा या रसायनमुक्त भाज्यांची मागणी करत आहेत. ओमकारने मराठीतील साम दाम दंड भेद, स्वप्न तुझे नि माझे, स सासूचा, अगम्य, संघर्षयात्रा या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो रुपेरी पडद्यापासून दूर होता. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या संघर्षयात्रा चित्रपटात त्याचे अखेरचं दर्शन झाले होते. त्यानंतर तो काय करतो, कुठे आहे, काय चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि मित्रांना पडले होते. मात्र अखेर ओमकार अनोख्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करत असल्याचे समोर आल्याने चाहते आणि मित्रांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

Web Title: marathi actor omkar Karve left acting & doing organic farming for Income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.