Exclusive आस्ताद काळे झळकणार अरबाज खानसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 12:03 PM2016-12-09T12:03:25+5:302016-12-09T12:03:25+5:30

  बेनझीर जमादार           सरस्वती या मालिकेतून अभिनेता आस्ताद काळे हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत ...

Exclusive Aastad Kale will be seen with Arbaaz Khan | Exclusive आस्ताद काळे झळकणार अरबाज खानसोबत

Exclusive आस्ताद काळे झळकणार अरबाज खानसोबत

googlenewsNext
 
m> बेनझीर जमादार
         
सरस्वती या मालिकेतून अभिनेता आस्ताद काळे हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचप्रमाणे त्याने  पुढचं पाऊल या मालिकेतूनदेखील त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आस्तादच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आस्ताद लवकरच बॉलिवुडमध्ये पदापर्ण करत आहे. इतकेच नाही तर तो बॉलिवुडमध्ये अभिनेता अरबाज खानसोबत झळकणार असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. आस्ताद सांगतो, खरचं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेदेखील मी खूप आनंदित आहे. इतके वर्ष कॅमेरासमोर काम केले आहे. पण पहिल्यांदा ज्यावेळी मला बॉलिवुडमध्ये काम करणार का हे विचारण्यास फोन आला होता. त्यावेळी खरचं मी घाबरलो होतो. तसेच बॉलिवुड चित्रपटात मी अ‍ॅक्शन भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडच्या तगडा अभिनेता अरबाज खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली ही खरचं खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत काही अ‍ॅक्शन सीन्स केले आहे.  या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्यासोबत काही अ‍ॅक्शन सीन्स देताना पहिल्यांदा खूप टेंशन आले होते. मात्र अरबाजने जो प्रतिसाद दिला त्यामुळे खरचं माझी ही भितीच दूर झाली होती. अरबाज खरचं खूप चांगला माणूस आहे. कुठे ही त्याने मला परके असल्याचे जाणवून दिले नाही. या चित्रपटातील माझा अ‍ॅक्शन सीन खूप मोठा आहे. अ‍ॅक्शन करायचे होते म्हणून प्रशिक्षण वगैरे काही घेतले नाही. मात्र एक ऐतिहासिक मराठी आगामी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात जे शिकण्यास मिळाले त्या गोष्टीचा फायदा या चित्रपटासाठी झाला आहे. मराठी चित्रपटाप्रमाणेच बॉलिवुडच्या या चित्रपटाच्या सेटवरदेखील ते नियोजन, शिस्त, कलाकारांचा सपोर्ट, ते मिळणार प्रोत्साहन हे खरचं लाजवाब होते. त्याचप्रमाणे मिळालेल्या या संधीचा सोने करण्याचा माझा हा प्रयत्न असणार आहे. आस्तादने यापूर्वी नाटक, मालिका आणि चित्रपटातूनदेखील आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.

Web Title: Exclusive Aastad Kale will be seen with Arbaaz Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.