ऋत्विक केंद्रेची मुख्य भूमिका असलेला 'ड्राय डे' होणार १३ जुलैला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 05:32 AM2018-05-02T05:32:56+5:302018-05-02T11:02:56+5:30

आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत ...

Displaying the main role of the Ritwik Kendra, "Dry Day" will be held on July 13 | ऋत्विक केंद्रेची मुख्य भूमिका असलेला 'ड्राय डे' होणार १३ जुलैला प्रदर्शित

ऋत्विक केंद्रेची मुख्य भूमिका असलेला 'ड्राय डे' होणार १३ जुलैला प्रदर्शित

googlenewsNext
ंद सागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ड्राय डे' या नावामुळेच या चित्रपटाची खूप सारी चर्चा होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकत्याच पार पडलेल्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर जाहीर करण्यात आली.
खरे तर 'ड्राय डे' हा चित्रपट गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण सेन्सॉरच्या नियमावलीमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अखेरीस ही प्रतीक्षा आता संपली असून संजय पाटील यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार असल्याचे सोशल नेटवर्किंग साईटद्वारे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून लोकांनीही सोशल नेटवर्किंगद्वारे या चित्रपटाच्या घोषणेचे स्वागत केले आहे. 
आजच्या तरुणपिढीचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार हे निश्चित! कारण संगीत दिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या सिनेमातील 'अशी कशी' आणि 'गोरी गोरी पान' या सुपर हिट गाण्यांनी रसिकांची मने यापूर्वीच जिंकली असल्यामुळे 'ड्राय डे' सिनेमाची उत्कंठा सिनेप्रेक्षकांना लागली आहे.  
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या आगळ्यावेगळ्या 'ड्राय डे' चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून नितीन दीक्षित यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, आयली घिए, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला महत्तवाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'ड्राय डे' हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : ऋत्विकचे "मोहे पिया" हे नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात

Web Title: Displaying the main role of the Ritwik Kendra, "Dry Day" will be held on July 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.