रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2017 03:11 PM2017-01-02T15:11:17+5:302017-01-02T15:11:17+5:30

गेल्या कित्येक दिवसांपासून  रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार गौरव घाटणेकर आणि ...

Display of poster of movie of Radio Nights 6.06 | रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

googlenewsNext
ल्या कित्येक दिवसांपासून  रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार गौरव घाटणेकर आणि कादंबरी कदम प्रेक्षकांना एकत्रित पाहायला मिळणार आहे. नुकतेच गौरवने या चित्रपटाचे पोस्टर सोशलमीडियावर अपलोड केले आहे. त्याच्या या पोस्टरला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. सस्पेन्स-थ्रीलर हा चित्रपट असणार आहे. प्राईम डायरेक्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत रेडिओ नाईट्स ६.०६ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद आचरेकर यांनी केले आहे. यापूर्वी गौरव घाटणेकर आणि कादंबरी कदम तुझविण सख्या रे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेतून दोंघानी ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. मात्र आता प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच  रेडिओ नाईटस् ६.०६ या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आता ही जोडी सिल्व्हर स्क्रीन पडदयावर झळकण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांचा ही लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेता गौरव घाटणेकर हा श्रुती मराठीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. तर अभिनेत्री कादंबरी कदमदेखील अविनाश अरूणसोबत विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे या दोघांसाठी ही हा चित्रपट खास असणार आहे. गौरव हा सध्या विविध नाटकांमध्ये व्यग्र आहे. तर गौरव हा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या वजनदार या चित्रपटात पाहायला मिळाला आहे. आता तो महेश मांजरेकर यांच्या वाडा या आगामी चित्रपटातदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. 


  



Web Title: Display of poster of movie of Radio Nights 6.06

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.