धनश्री काडगावकरच्या "चिठ्ठी"चा असा झाला घोळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 05:24 AM2017-12-11T05:24:02+5:302017-12-11T10:54:02+5:30

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.या मालिकेमुळे धनश्री काडगांवकरला चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय.मालिकेत ...

Dhan Dhri Kadgaonkar's "Chitthi" has become like a ghost? | धनश्री काडगावकरच्या "चिठ्ठी"चा असा झाला घोळ?

धनश्री काडगावकरच्या "चिठ्ठी"चा असा झाला घोळ?

ुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.या मालिकेमुळे धनश्री काडगांवकरला चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय.मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.या मालिकेतील राणा दा (हार्दिक जोशी) आणि पाठकबाईंच्या (अक्षया देवधर) जोडीनं रसिकांची मनं आधीच जिंकली आहेत.त्यापाठोपाठ धनश्रीही आता सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतेय.छोट्या पडद्यावर रसिकांची पसंती मिळवली नंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी धनश्री सज्ज झाली आहे. धनश्री काडगावकर आता "चिठ्ठी" चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून येत्या नवीन वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ही त्यांनीच केली आहे. वैभव काळुराम डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.धनश्री काडगावकर आणि शुभंकर एकबोटे ही नवी जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.एक तरूण आपल्या प्रेयसीला चिठ्ठी लिहितो मात्र,ती चिठ्ठी तिला मिळतच नाही अशी सगळी धमाल या चित्रपटाचं कथानक आहे. 'चिठ्ठी' या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत साधी,'गर्ल नेक्स्ट डोअर' अशी आहे.या चित्रपटाची लेखिका स्वरदा बुरसेनं माझं नाव या भूमिकेसाठी सुचवलं.मात्र,ऑडिशन वगैरे दिल्यानंतर मला ही भूमिका मिळाली.अतिशय धमाल,मनोरंजक असं हे कथानक आहे. प्रत्येक वयोगटाच्या रसिकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.दिग्दर्शक वैभव डांगे आणि संपूर्ण टीम बरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता.चित्रीकरणापूर्वी आमचं एक वर्कशॉप झालं होतं.चित्रपटात बरेच अनुभवी कलाकार असल्यानं त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.मजेशीर गोष्ट म्हणजे,या चित्रपटात काही लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव धमाल होता. त्यांच्या एनर्जीनं सेटवर खेळकर वातावरण असायचं.या मुलांनी केलेलं काम पाहून आम्ही थक्क व्हायचो.प्रेक्षकांनाही हाच अनुभव येईल, याची मला खात्री आहे,'असंही धनश्रीनं सांगितलं.तर या "चिठ्ठी"चा नेमका काय घोळ झाला,हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडीशी वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Dhan Dhri Kadgaonkar's "Chitthi" has become like a ghost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.