प्रियंकाने टकीला पिऊन हे काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2016 05:35 PM2016-10-27T17:35:59+5:302016-10-28T09:27:30+5:30

हल्ली बॉलिवूड असो वा हॉलिवूड सगळीकडेच प्रियंका चोपडा हे नाव चर्चेत आहे. क्वांटिको मालिकेनिमित्त सध्या प्रियंका विविध शोमध्ये हजेरी ...

What did Priyanka do with tequila? | प्रियंकाने टकीला पिऊन हे काय केले?

प्रियंकाने टकीला पिऊन हे काय केले?

googlenewsNext
्ली बॉलिवूड असो वा हॉलिवूड सगळीकडेच प्रियंका चोपडा हे नाव चर्चेत आहे. क्वांटिको मालिकेनिमित्त सध्या प्रियंका विविध शोमध्ये हजेरी लावत असल्याने अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. आता ती कॉमेडी टॉक शो ‘द एलेन डीजेनरेस’ या शोमध्ये पोहचली होती. याठिकाणी तिने मिस वर्ल्ड बनण्यापासून ते भारतीयांच्या सवयींविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

आॅस्कर अवॉर्ड्स होस्ट केलेल्या एलेन डीजेनरेसने प्रियंकाकडून बºयाचशा सिक्रेट बाबी उलगडून घेतल्या. यावेळी एलेनने तिला टकीला आॅफर केली. प्रियंकानेदेखील कुठलाही विचार न करता लाइव्ह शोमध्येच टकीलाची टेस्ट चाखली. त्यानंतर प्रियंकाने जे उलगडे केले ते धक्कादायक होते. 

प्रियंकाने सांगितले की, यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या ईमीस अवॉर्डसमध्ये जाण्याअगोदर मला खूप भूख लागली होती. त्यामुळे मी उपाशीपोटीच टकीला घेतली होती. याचा परिणाम म्हणून मला नशा चढली होती. त्यानंतर जे काही घडले ते मला फारसे आठवत नाही. यावेळी एलेनने प्रियंकाला अमेरिकी लोक खूप मद्यपान करीत असल्याचे सांगितले. याला उत्तर देताना प्रियंकानेदेखील भारतीय लोकांच्या मद्यपानाबाबतच्या आवडी-निवडी शेअर केल्या.

वास्तविक या शोमध्ये प्रियंकासाठी ‘ड्रिंको’ नावाचा एक गेम तयार करण्यात आला होता. यामध्ये गेमबोर्डवरील एक कॉइन खाली पाडून बºयाचशा आॅब्सटिकल्समधून अडकत खाली ठेवलेल्या ग्लासांमध्ये त्याला पाडायचे होते. यामध्ये काही ग्लास पाण्याने तर काही टकीलाने भरलेले होते. जर हा कॉइन पाण्याच्या ग्लासात पडला तर पाणी अन् जर टकीला असलेल्या ग्लासात पडला तर टकीला पिण्यासाठी मिळत असे. प्रियंकानेदेखील हा कॉइन टकीलाच्या ग्लासमध्येच पाडला अन् तिला लाइव्ह टकीला पिण्यास मिळाली. 

Web Title: What did Priyanka do with tequila?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.