यंदाच्या दिवाळीत 'द मार्व्हल्स' धमाकेदार एन्ट्री! चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:35 PM2023-07-22T17:35:17+5:302023-07-22T17:35:28+5:30

मार्व्हल सिनेमॅटीक विश्वात पहिल्यांदाच तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून त्या सगळ्या दुष्टांचा आणि शत्रूंना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

This year's Diwali, The Marvels' explosive entry! The action packed trailer of the film was released | यंदाच्या दिवाळीत 'द मार्व्हल्स' धमाकेदार एन्ट्री! चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर झाला रिलीज

यंदाच्या दिवाळीत 'द मार्व्हल्स' धमाकेदार एन्ट्री! चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर झाला रिलीज

googlenewsNext

अखेर प्रतीक्षा संपली! प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण अखेर आला आहे. यंदाची दिवाळी ही सर्वार्थाने लक्षात राहणारी असा मार्व्हल सिनेविश्वाने बहुधा प्रणच केला आहे,  कारण मार्व्हल स्टुडियोचा ‘द मार्व्हल्स’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रसिद्ध होणार आहे. कौटुंबिक मनोरंजनाची १०० टक्के हमी देणारा हा चित्रपट भारतात दिवाळीत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा एक धमाकेदार हिंदी ट्रेलर शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आला.

मार्व्हल सिनेमॅटीक विश्वात पहिल्यांदाच तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून त्या सगळ्या दुष्टांचा आणि शत्रूंना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे हा चित्रपट मार्व्हल चित्रपटप्रेमींसाठी आणि सर्वसामान्य सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. द मार्व्हल्स चित्रपटात शक्तीशाली अव्हेंजर्सपैकी एक असलेली कॅरोल डॅनव्हर्स उर्फ कॅप्टन मार्व्हलने सुप्रीम इंटेलिजन्सला पराभूत करत जुलमी 'क्री'सोबत मुकाबला करत आपली ओळख पुन्हा मिळवलेली असते. मात्र काही घटना अशा घडतात ज्यामुळे अस्थिर विश्वाला वाचवण्याचा भार पुन्हा कॅरोलच्या खांद्यावर येतो. या घटनांमुळे कॅरोलला 'क्री' बंडखोरांशी निगडीत एका विवरामध्ये जावं लागतं. या विवरात शिरल्यानंतर कॅप्टन मार्व्हलकडे असलेल्या शक्तींमध्ये काहीतरी गडबड होते आणि कॅप्टन मार्व्हलची निस्सीम भक्त असलेल्या कमला खान उर्फ ‘मिस मार्व्हल’ आणि कॅरोलच्या मैत्रिणीची मुलगी कॅप्टन मोनिका रॅम्ब्यू उर्फ S.A.B.E.R.अॅस्ट्रोनॉट या दोघींच्या शक्तींसोबत कॅरोल डॅनव्हर्सच्या शक्तींची गुंतागुंत निर्माण होते. या सगळ्या त्रांगड्यातून बाहेर पडण्यासाठी या तिघींना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरत नाही. विश्वाला वाचवण्यासाठी या तिघी एकत्र येतात आणि त्या ज्या पद्धतीने दुष्ट शक्तींशी लढा देतात ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 

 या धमाकेदार अॅक्शनपॅक्ड चित्रपटामध्ये अभिनेत्री ब्री लार्सन, टेयोना पॅरीस, इमान वेलानी, सॅम्युएल एल जॅक्सन,  झावी अॅश्टन आणि पार्क सिओ जून यांच्या प्रमुख भूमिका आहे. निया डिकोस्टा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे केविन फीग हे निर्माते आहेत.  मार्व्हल स्टुडियोची निर्मिती असलेला  “द मार्व्हल्स” हा चित्रपट दिवाळीमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: This year's Diwali, The Marvels' explosive entry! The action packed trailer of the film was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.