या अभिनेत्रीला नव्हती लहानपणी मेकअप करण्याची परवानगी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 10:42 AM2018-06-17T10:42:42+5:302018-06-17T16:12:42+5:30

‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाची अभिनेत्री ल्युपिटा न्योंगो आज एक आघाडीची अभिनेत्री आहे. ‘एसीशोबीज डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या मते, ल्युपिटा ...

This actress was not allowed to make a child's makeup !! | या अभिनेत्रीला नव्हती लहानपणी मेकअप करण्याची परवानगी!!

या अभिनेत्रीला नव्हती लहानपणी मेकअप करण्याची परवानगी!!

googlenewsNext
्लॅक पँथर’ या चित्रपटाची अभिनेत्री ल्युपिटा न्योंगो आज एक आघाडीची अभिनेत्री आहे. ‘एसीशोबीज डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या मते, ल्युपिटा आता ‘स्टाईल चमेलियन’ बनली आहे. याचे कारण म्हणजे, ल्युपिटा मेकअप व हेअरस्टाईलसोबत कायम वेगवेगळे प्रयोग करत असते. पण मेकअपबद्दलचा ल्युपिटाचा पहिला अनुभव तुम्ही ऐकाल तर अवाक व्हाल. होय, एका ताज्या मुलाखतीत तिने आपला हा अनुभव शेअर केला.
‘मला लहानपणी मेकअप करण्याची परवानगी नव्हती. पण मी १८ वर्षांचे झाले आणि माझ्या एका आंटीने माझा मेकओव्हर केला. पहिल्यांदा  माझ्या चेह-यावर लाईटर फाऊंडेशन लावले गेले तेव्हा मी अक्षरश: रडत होते. स्वत:ला आरशात बघून रडू लागले होते. कारण त्या फाऊंडेशनचा शेड माझ्या स्किनशी कुठेही मॅच होणारा नव्हता,’असे तिने सांगितले.


काही दिवसांपूर्वी ल्युपिटाने मुलींन शाळेत मेकअप करून येऊ देण्याची परवानगी मिळावी, यासाठी मोहिम उघडली होती. त्यावेळीही तिने आपले असेच अनुभव शेअर केले होते. ‘मी अशा शाळेत शिकले, जी केवळ मुलांची शाळा होती. शेवटच्या दोन वर्षांत केवळ मुलींना प्रवेश मिळायचा. या शाळेचे नियम माझ्यासाठी धक्कादायक होते. कारण या शाळेत मुलींच्या मेकअपवर बंदी होती. त्याशाळेत ७०० मुले आणि काही मोजक्या मुली होत्या. मुलींची संख्या कमी असल्यामुळे शाळेचा तो जाचक नियम आमच्यावर थोपवला जात होता. शेवटी मी याविरोधात दाद मागायचा निर्णय घेतला होता,’ असे तिने सांगितले होते.
मी शाळेत असताना मेकअप करू शकले नाही. पण ज्या मुलींना मेकअप करायला आवडते, त्यांना शाळेत मेकअप करून येण्याची परवानगी असावी, असे माझे मत असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: This actress was not allowed to make a child's makeup !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.