जरीन खानची पोलिसात धाव, एक्स मॅनेजरने दिली जीवे मारण्याची धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:07 PM2018-12-07T12:07:41+5:302018-12-07T12:07:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुठल्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वादामुळे. होय, जरीने तिची पूर्वाश्रमीची मॅनेजर अंजली अथविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

zareen khan file fir against her ex manager | जरीन खानची पोलिसात धाव, एक्स मॅनेजरने दिली जीवे मारण्याची धमकी!!

जरीन खानची पोलिसात धाव, एक्स मॅनेजरने दिली जीवे मारण्याची धमकी!!

googlenewsNext
ठळक मुद्देअंजलीने आपल्याला अश्लिल मॅसेज केलेत व जीवे मारण्याची धमकी दिली,खोट्या बातम्या पेरून आपली प्रतिमा मलीन केली, तसेच करार संपल्यानंतरही आपल्या नावावर सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले, असे आरोप जरीनने आपल्या तक्रारीत केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुठल्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वादामुळे. होय, जरीने तिची पूर्वाश्रमीची मॅनेजर अंजली अथविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंजलीने आपल्याला अश्लिल मॅसेज केलेत व जीवे मारण्याची धमकी दिली,खोट्या बातम्या पेरून आपली प्रतिमा मलीन केली, तसेच करार संपल्यानंतरही आपल्या नावावर सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले, असे आरोप जरीनने आपल्या तक्रारीत केले आहेत.
जरीनच्या तक्रारीनंतर मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात अंजलीविरोधात भादंवीच्या कलम ५०९ अन्वये (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार व कृती करणे) गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंजली अथने जरीनसोबत तीन ते चार महिने काम केले होते. यादरम्यान पैशाच्या व्यवहारावरून दोघींमध्ये वाद झाला होता. या प्रकरणासंदर्भात दोघींही मॅसेजद्वारे एकमेकींशी बोलल्या आणि याचदरम्यान अंजलीने जरीनला आक्षेपार्ह मॅसेज पाठवले. अंजली अथा हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत मॅनेजर म्हणून काम केले आहे.


सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.   कॅटरिना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता. अर्थात इतके करूनही बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नव्हता. ‘वीर’ चित्रपटानंतर जरीनचे वजन वाढले होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिला बराच संघर्ष करावा लागला. अलीकडे जरीन ‘अक्सर 2’मध्ये दिसली होती.  या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जरीनसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकारानंतर जरीनने आयोजक व चित्रपटाच्या निर्मात्यांवर सुरक्षा न पुरवल्याचा आरोप केला होता. जरीनचा जानेवारीत ‘१९२१’ हा हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला होता.  हाऊसफूल २, हेट स्टोरी ३ या चित्रपटातही ती दिसली होती.

Web Title: zareen khan file fir against her ex manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.