हृतिक रोशनसोबत दिसत असलेल्या या मुलाची कथा वाचून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 02:55 PM2017-08-05T14:55:18+5:302017-08-05T21:08:15+5:30

विक्कीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘जेव्हा मी माझ्या ड्रॉव्हरची साफसफाई करीत होतो, तेव्हा मला हा फोटो मिळाला. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा मी हृतिकच्या ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो.

You will be shocked to read the story of this son who is seen with Hrithik Roshan. | हृतिक रोशनसोबत दिसत असलेल्या या मुलाची कथा वाचून तुम्हाला धक्का बसेल!

हृतिक रोशनसोबत दिसत असलेल्या या मुलाची कथा वाचून तुम्हाला धक्का बसेल!

googlenewsNext
सान’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणारा अभिनेता विक्की कौशल लवकरच अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत ‘राजी’ या चित्रपटात प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच मुंबई येथे सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विक्कीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये तो अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत उभा असल्याचे दिसत आहे. 

विक्कीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘जेव्हा मी माझ्या ड्रॉव्हरची साफसफाई करीत होतो, तेव्हा मला हा फोटो मिळाला. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा मी हृतिकच्या ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो. हृतिकचा तेव्हा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हापासूनच मी या हॅण्डसम स्टारचा फॅन झालो होतो. त्यावेळी मला कोणीतरी सांगितले होते की, हृतिक त्याच व्यक्तीला भेटतो ज्याला ‘एक पल का जीना’ या त्याच्या गाण्यावर डान्स करता येतो. मला त्यासाठी तीन दिवस डान्स प्रॅक्टिस करावी लागली. जेव्हा मी त्याला भेटलो तो मला एवढा चांगला वाटला की, त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे बोल नाहीत. त्यामुळेच माझ्यासाठी ही भेट आजदेखील रिफ्रेशिंग आहे. तो पुरुष नाही तर तो महापुरुष आहे, असेच म्हणावे लागेल.’



विक्कीच्या या पोस्टला हृतिकनेही रिप्लाई केला. हृतिकने लिहिले की, ‘मला तो क्षण आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! तू मोठा होऊन एक चांगला अभिनेता झाला आहेस. तुझ्या फ्यूचर प्रोजेक्टसाठी आॅल द बेस्ट, चित्रपटांमध्ये खूप नाव रोशन कर.’ मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटात विक्की एक आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा ‘सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे. आलिया चित्रपटात एका काश्मिरी मुलीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. विक्की आणि त्याची को-स्टार आलिया भट्ट चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर विकी संजय दत्तच्या बायोपिकमध्येही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटामुळे तो संजूबाबाच्या खूपच जवळ आला आहे. 

Web Title: You will be shocked to read the story of this son who is seen with Hrithik Roshan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.