​‘गोलमाल’सीरिजच्या तीन चित्रपटांचे किती होते बजेट? किती केली होती कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 07:43 AM2017-10-18T07:43:19+5:302017-10-18T13:13:19+5:30

अजय देवगण, अर्शद वारसी, तब्बू, परिणीती चोप्रा, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यासारख्या कलाकारांचा ‘गोलमाल अगेन’ बॉक्सआॅफिस रिलीज होत आहे. ...

What is the budget of three films of 'Gollam' series? How much did it earn? | ​‘गोलमाल’सीरिजच्या तीन चित्रपटांचे किती होते बजेट? किती केली होती कमाई?

​‘गोलमाल’सीरिजच्या तीन चित्रपटांचे किती होते बजेट? किती केली होती कमाई?

googlenewsNext
य देवगण, अर्शद वारसी, तब्बू, परिणीती चोप्रा, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यासारख्या कलाकारांचा ‘गोलमाल अगेन’ बॉक्सआॅफिस रिलीज होत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ‘गोलमाल’ सीरीजमधला पहिला चित्रपट ‘गोलमाल’ सन २००६ मध्ये आला होता.  त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ रिलीज झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे. ‘गोलमाल अगेन’ चाहत्यांच्या अपेक्षेवर किती खरा उतरतो, ते काळ ठरवेलच. पण आज आम्ही तुम्हाला ‘गोलमाल’ सीरिजच्या आधी रिलीज झालेल्या तीन चित्रपटांचे बजेट आणि त्यांची कमाई सांगणार आहोत.

गोलमाल- फन अनलिमिटेड



‘गोलमाल’ सीरिजचा पहिला चित्रपट सन २००६ मध्ये आला होता. सुमारे ११ कोटी रूपयांचा बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर सुमारे ७० कोटी रूपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने दिग्दर्शक रोहित शेट्टीला इंडस्ट्रीत एक नवी ओळख दिली होती.

गोलमाल रिटर्न्स



सन २००८ मध्ये दिवाळीवर रोहित शेट्टीने ‘गोलमाल रिटर्न्स’ हा सीरिजचा दुसरा सिनेमा आणला होता. या चित्रपटाचा बजेट होता २४ कोटी रुपए. ‘गोलमाल’ सीरिजचा हा चित्रपट सुपरडुपर हिट होता. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर १०८ कोटी रूपयांचा व्यवसाय केला होता. खरे तर ‘गोलमाल रिटर्न्स’ला समीक्षकांचे संमिश्र रिव्ह्यू मिळाले होते. पण प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट प्रचंड भावला होता.

गोलमान 3



सन २०१० मध्ये ‘गोलमान 3’ दिवाळीच्या मुहूर्तावरच रिलीज झाला होता. सुमारे ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. या सिनेमाने सुमारे १६० कोटी रूपयांची कमाई केली होती.

गोलमान अगेन



ALSO READ: Golmaal Again title track: ​ २६ वर्षे जुन्या स्टाईलमध्ये दिसला अजय देवगण

‘गोलमाल’ सीरिजचा ‘गोलमाल अगेन’ येत्या शुक्रवारी रिलीज होतो आहे. हा चित्रपट किती यशस्वी होईल, हे सांगता येणार नाही. पण या चित्रपटाचा बजेट मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चित्रपटाचे बजेट सुमारे ७० कोटी रुपए असल्याचे कळतेय. 

Web Title: What is the budget of three films of 'Gollam' series? How much did it earn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.