WATCH : ‘रईस’च्या ट्रेलरपूर्वी शाहरुखची ही खास झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 01:30 PM2016-12-01T13:30:42+5:302016-12-01T13:30:42+5:30

सिनेमाचा पहिला ट्रेलर ७ डिसेंबरला लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ट्रेलर केवळ इंटरनेटवर नाही तर देशभरातील सुमारे ३५०० स्क्रीन्सवर एकसोबत दाखवला जाणार आहे.

WATCH: A special glimpse of Shahrukh before 'Rais' trailer! | WATCH : ‘रईस’च्या ट्रेलरपूर्वी शाहरुखची ही खास झलक!

WATCH : ‘रईस’च्या ट्रेलरपूर्वी शाहरुखची ही खास झलक!

googlenewsNext
ुप्रतीक्षित चित्रपट ‘रईस’चा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सिनेमाचा पहिला ट्रेलर ७ डिसेंबरला लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ट्रेलर केवळ इंटरनेटवर नाही तर देशभरातील सुमारे ३५०० स्क्रीन्सवर एकसोबत दाखवला जाणार आहे. 

तत्पूर्वी फॅन्सना खुश करण्यासाठी शाहरुखने एक स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो चाहत्यांना ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देताना दिसतो. तसेच चित्रपटातील विविध शॉटस्सुद्धा दाखवले जातात. त्यामध्ये किंग खानचे एक नवे रुप पाहायला मिळते. एवढेच नाही तर त्यादिवशी तुम्ही थेट किंग खानला तुमचे प्रश्न विचारू शकता. तो स्वत: त्याचे उत्तर देईल.

नऊ शहरात एकाच वेळी हा लाँच सोहळा होणार असून त्यामध्ये  दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, मोगा पंजाब, इंदौर, अहमदाबाद या नऊ शहरांतील निवडक थिएटर्सचा सामावेश आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शाहरूख उपस्थित प्रेक्षकांची बातचीत करणार आहे.

                                              

अशा प्रकारे ट्रेलर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऐंशीच्या दशकातील कथानक असणाऱ्या ‘रईस’मध्ये शाहरुख दारू माफिया रईस आलमची भूमिका साकारत असून एक प्रामाणिक पोलिस अधिकारी एसीपी गुलाम पटेल जेव्हा त्याचे साम्राज्य उधळू पाहतो तेव्हा त्याच्याशी होणारा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो पोलिस अधिकारी म्हणजे नवाजुद्दिन सिद्दिकी.

हा व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी शाहरुखने झकास सेल्फी काढून ट्विट केले की, ‘रईसच्या कामानिमित्त दूर वर प्रवास करावा लागतो. सध्या मी ‘डिअर जिंदगी’च्या विचारात असून आलिया आणि गौरी शिंदेने मला एक गाण सुचवलं आहे. #लेटस्ब्रेकअप.’


  ट्विटस : शाहरुख खान

दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने नवाजुद्दिन आणि राहुल ढोलकियासोबत काढलेली सेल्फी शेअर केली आहे. सोबत लिहिले की, ‘राहल आणि नवाज ‘रईस’वर शेवटचा हात मारत आहे. मित्रांनो, तुम्ही दोघे कमाल आहात!’ 

cnxoldfiles/a> ‘उरी हल्ल्या’नंतर हिंदी चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: WATCH: A special glimpse of Shahrukh before 'Rais' trailer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.