बºयाचदा घरातच चोरी करताना विवेक ओबेरॉयला पत्नीने पकडले; वाचा काय आहे किस्सा !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:54 PM2017-10-25T14:54:31+5:302017-10-25T20:24:31+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून विवेक ओबेरॉयला ओळखले जाते. शिवाय त्याचे वडील सुरेश ओबेरॉय यांच्यामुळेही त्याचे इंडस्ट्रीत वजन आहे. विवेकने ...
ब लिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून विवेक ओबेरॉयला ओळखले जाते. शिवाय त्याचे वडील सुरेश ओबेरॉय यांच्यामुळेही त्याचे इंडस्ट्रीत वजन आहे. विवेकने रामगोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तो अभिनेता अजय देवगण याच्यासोबत झळकला होता. विवेकच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दमदार कमाई केल्याने त्याला सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांच्या आॅफर्स होत्या. मात्र नंतरच्या काळात तो जणू काही पडद्यावरून गायबच झाला. त्यानंतर त्याला ‘मस्ती’ सिरिजमध्ये संधी मिळाली. काही दिवसांपूर्वीच तो ‘मस्ती’मधील त्याचा सहअभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत ‘बॅँक चोर’मध्ये बघावयास मिळाला होता. या चित्रपटात त्याने एका दमदार पोलीस आॅफिसरची भूमिका साकारली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, विवेकला वास्तविक जीवनात चोरीची सवय आहे. धक्का बसला ना? पण आज आम्ही त्याचा हाच किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.
‘बॅँक चोर’मध्ये पोलीस आॅफिसरची भूमिका साकारणाºया विवेकला रिअल लाइफमध्ये मात्र चोरीची सवय आहे. हे आम्ही नाही तर स्वत: विवेक ओबेरॉयनेच सांगितले आहे. ‘बॅँक चोर’ या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान त्याने याबाबतचा खुलासा केला होता. विवेकने म्हटले होते की, मला चोरी करायची वाईट सवय आहे. माझ्या पत्नीने तर मला बºयाचदा चोरी करताना पकडले आहे.
वास्तविक विवेकला या इव्हेंटदरम्यान त्याच्या लहानपणी चोरी केल्याच्या घटनांविषयी विचारण्यात आले होते. परंतु त्याने ‘लहानपणीचे सोडा, मी आताही चोरी करतो. मला चॉकलेट खूप आवडतात. परंतु माझ्या पत्नीला माझी ही आवड अजिबातच आवडत नाही. ती मला चॉकलेट खाऊ देत नाही. परंतु जेव्हा आम्ही मुलांसाठी चॉकलेट खरेदी करतो तेव्हा ती सर्व चॉकलेट लपवून ठेवते.’ पुढे बोलताना विवेकने सांगितले होते की, जेव्हा माझी पत्नी चॉकलेट लपवून ठेवते तेव्हा मी ते शोधून खातो. बºयाचदा पत्नीने मला चॉकलेट चोरताना रंगेहाथ पकडले आहे. यावरून रितेश आणि आफताब शिवदासानी माझी खिल्ली उडवित असल्याचेही त्याने सांगितले.
विवेक ओबेरॉयचे लग्न प्रियंका अल्वा हिच्याबरोबर झाले. प्रियंका कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. या दांपत्याला दोन मुले आहेत. मुलाचे नाव विवान असून, मुलीचे नाव अमाया आहे. सध्या विवेक त्याच्या फिल्मी ट्रॅकवर परतण्यासाठी धडपड करीत आहे. किंबहुना तो काही प्रोजेक्टवर कामही करीत आहे.