टिवटिवाट भोवला; रामगोपाल वर्मावर आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 01:32 PM2017-03-09T13:32:38+5:302017-03-09T19:02:38+5:30

महिलादिनी आक्षेपार्ह ट्विट्स करून वाद ओढवून घेणाºया दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा ...

Twitwat Bhawla; Ramgopal Verma filed another one | टिवटिवाट भोवला; रामगोपाल वर्मावर आणखी एक गुन्हा दाखल

टिवटिवाट भोवला; रामगोपाल वर्मावर आणखी एक गुन्हा दाखल

googlenewsNext
िलादिनी आक्षेपार्ह ट्विट्स करून वाद ओढवून घेणाºया दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा येथील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा म्हाब्रे यांनी हा गुन्हा दाखल केल्याने रामगोपाल वर्मा यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कारण हिंदू ग्रुप हिंद जागृती या महिला शाखेच्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी गोवा पोलिसांत वर्माविरोधात सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी विशाखा म्हाब्रे यांची तक्रार नोंदवून घेतली असून, सायबर कायद्यांतर्गत वर्मा यांच्यावर २९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
{{{{twitter_post_id####}}}}

दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, अशाप्रकारच्या अश्लील शुभेच्छा सर्वच महिलांसाठी अपमानजनक आहेत. रामगोपाल वर्मा यांनी ८ मार्च या महिलादिनी एकापाठोपाठ एक ट्विट करून महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला जात आहे. वर्माने त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘वर्षातील प्रत्येक दिवस पुरुषांचा असतो. मग याच कारणाने पुरुष दिवस साजरा केला जात नाही का?’ या ट्विटनंतर रामगोपाल वर्मा यांनी जणूकाही ट्विटचा धडाकाच लावला. अखेरीस त्यांनी सनी लिओनीचा दाखल देत या दिवसात विघ्न आणले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘माझी अशी इच्छा आहे की, जगातील प्रत्येक महिलेने पुरुषांना सनी लिओनीसारखा आनंद द्यायला हवा.’ 

वर्मा यांच्या याच ट्विटनंतर मात्र सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर चहूबाजूने टीका करण्यात आली. अशातही आपण केलेल्या चुकीची उपरती न होता, वर्मा यांनी टिवटिवाट सुरूच ठेवला. त्यांनी आणखी एक ट्विट करीत म्हटले की, ‘सनी लिओनीवरील माझ्या ट्विटवर काही ढोंगी लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. यावेळी त्याने सनीचे कौतुकही केले. इतर कोणत्याही महिलेपेक्षा सनी अधिक प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. लवकरच मी तिच्यावर लघुपट बनविणार असल्याचेही म्हटले. 
मात्र, याचे पडसाद खºया अर्थाने दुसºया दिवशी उमटण्यास सुरुवात झाली. कारण आता वर्मा यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होत असून, राजकारण्यांनीदेखील यात उडी घेतली आहे. परंतु एवढ्या सहजासहजी उपरती होईल ते रामगोपाल वर्मा कसले? त्यांनी या गुन्ह्यांवरही आपली प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, सनी लिओनीच्या १८ लाख फॉलोअर्सचा असन्मान करण्याच्या विरोधात मी विशाखा विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. 



मात्र, रामगोपाल वर्माचा हा स्वभाव आता अधिकच खटकू लागल्याने कॉँग्रेसनेही महाराष्टÑ सरकार आणि राज्य महिला आयोगाकडे वर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. रामगोपाल वर्मा याचा ‘सरकार-३’ लवकरच रिलीज होणार असल्याने रामगोपाल वर्माचा हा वाद त्याला कितपत पोषक ठरणार, हे बघणे मजेशीर ठरेल. एक मात्र नक्की रामगोपाल वर्मा यांनी वेळेत या प्रकरणाचा खुलासा न केल्यास त्यांच्याविरोधात रान पेटण्याची शक्यता आहे. 

Web Title: Twitwat Bhawla; Ramgopal Verma filed another one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.