ट्विंकल खन्नाला बनायचे नव्हते अभिनेत्री, तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 03:31 PM2018-06-05T15:31:30+5:302018-06-05T21:01:30+5:30

अभिनेत्री ट्विंकल खन्ना सुपरस्टार अक्षयकुमारची पत्नी आहे. तिचे आई-वडील बॉलिवूड सुपरस्टार्स राहिले आहेत. तिचे शालेय शिक्षणही निर्माता करण जोहरसारख्या ...

Twinkle Khanna did not want to be an actress, while doing career in this field! | ट्विंकल खन्नाला बनायचे नव्हते अभिनेत्री, तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

ट्विंकल खन्नाला बनायचे नव्हते अभिनेत्री, तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

googlenewsNext
िनेत्री ट्विंकल खन्ना सुपरस्टार अक्षयकुमारची पत्नी आहे. तिचे आई-वडील बॉलिवूड सुपरस्टार्स राहिले आहेत. तिचे शालेय शिक्षणही निर्माता करण जोहरसारख्या सेलिब्रिटींबरोबर झाले आहे. अशात इतरांप्रमाणे तिलाही बॉलिवूडमध्ये नाव कमाविण्यासाठी दबाव टाकला गेला असेल, पण आश्चर्याची बाब म्हणजे तिला बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास काहीच रस नव्हता. विशेष म्हणजे तिने याबाबतची प्रामाणिकपणे जाहीर कबुलीही दिली आहे. 

याविषयी ट्विंकलने सांगितले की, जेव्हा तुम्ही तुमच्या यशाला अधिक गांभीर्याने घेत नाही, तेव्हा अपयशातून बाहेर पडणे म्हणावे तेवढे सोपे नसते. इयत्ता बारावीत गणितात मला ९७ गुण होते. मला एक चार्टर्ड अकाउंटंट बनायचे होते. परंतु आई-वडील बॉलिवूडमध्ये सुपस्टार्स असल्याने त्यांना मी बॉलिवूडव्यतिरिक्त इतर क्षेत्रात करिअर करावे हे पटवून सांगणे खूप अवघड होते. माझी आई मला सांगायची की जर तुला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे आहे तर ते तू बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केल्यानंतरही बनू शकतेस. मात्र चित्रपटात अभिनेत्री बनणे नक्कीच सोपे नाही. त्यामुळे तू अगोदर बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार कर. 

पुढे बोलताना ट्विंकलने सांगितले की, मी माझे आईचे ऐकले अन् अभिनय क्षेत्रात आली. बॉलिवूडमध्ये आठ वर्ष करिअर केल्यानंतर मला याची जाणीव झाली की, एक अभिनेत्री म्हणून मी अयशस्वी ठरली आहे. हे स्वीकारणे माझ्यासाठी त्रासदायक होते, परंतु मी यावरून फारशी त्रस्त नव्हते. कारण मी एक अभिनेत्री म्हणून जरी अयशस्वी ठरले असले तरी, आयुष्यात नक्कीच अयशस्वी ठरली नाही. याचा अर्थ असा की, मी आता नवनव्या गोष्टी शिकण्यावर भर देत आहे, असेही तिने सांगितले. 


Web Title: Twinkle Khanna did not want to be an actress, while doing career in this field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.