बालपणीच्या ‘या’ सवयीमुळे पडले टायगर श्रॉफचे टायगर हे नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:40 AM2018-07-09T08:40:20+5:302018-07-09T08:42:34+5:30

टायगर बॉलिवूडमध्ये आला, तेव्हा अनेकांना त्याचे टायगर हे नाव काहीसे विचित्र वाटले.  जॅकी यांनी मुलाचे नाव टायगर का ठेवावे, असाही प्रश्न अनेकांना त्यावेळी पडलेला.

tiger shroff real name revealed by his father jackie shroff | बालपणीच्या ‘या’ सवयीमुळे पडले टायगर श्रॉफचे टायगर हे नाव!!

बालपणीच्या ‘या’ सवयीमुळे पडले टायगर श्रॉफचे टायगर हे नाव!!

googlenewsNext

अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ आज तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. टायगरला ओळखत नाही, असा सिनेप्रेमी विरळाच. टायगर बॉलिवूडमध्ये आला, तेव्हा अनेकांना त्याचे टायगर हे नाव काहीसे विचित्र वाटले.  जॅकी यांनी मुलाचे नाव टायगर का ठेवावे, असाही प्रश्न अनेकांना त्यावेळी पडलेला. पण आता, या प्रश्नाचे उत्तर मिळालेय. तुम्हाला कदाचितचं माहित असेल की, टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे वडिल जॅकी यांचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. जॅकी श्रॉफ यांनी खूप लहान वयात या भावाला गमवले होते. पण मग जय हेमंतचे टायगर हे नाव कसे पडले? अलीकडे जॅकी श्रॉफ यांनी याबद्दल खुलासा केला.

 टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. जॅकी याबद्दल सांगतात, त्याला ही सवय कशी पडली होती, मला ठाऊक नाही. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा बदडले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय वाढली. घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही तो चावायचा. मग मीच त्याचे टायगर हे नाव ठेवले. टायगर व कृष्णा (टायगरची लहान बहीण) खूप खेळायचे. तितकेच भांडायचे. एकदा दोघांमध्ये इतके जोरदार भांडण झाले की, टायगरने कृष्णाला चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की  तिला डॉक्टरकडे न्यावे लागले. यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची चाटवली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची चाटवायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.

आज टायगरने अ‍ॅक्शन व अ‍ॅक्टिंग दोन्हीबदद्ल मला मागे टाकले आहे. मी तर नशीबाने अभिनेता झालो. त्यावेळी मला अभिनय काय असतो हेही माहित नव्हत. मी टायगरला कधीच त्याच्या अ‍ॅक्टिंगबाबत सल्ला देत नाही. माझ्या मते, या इंडस्ट्रीत त्याच्या वडिलांपेक्षा अनेक मोठे स्टार्स आहेत. ते त्याला माझ्यापेक्षा उत्तम सल्ला देऊ शकतात, असे जॅकी यांनी सांगितले.
लहानपणचा टायगर प्रचंड खट्याळ होता. तेवढाच हट्टी आणि रागीटही होता. पण तोच टायगर आज कमालीचा विनम्र आणि शांत झालाय. आज तो मला समजवतो. मी तब्येतीची काळजी घेत नाही म्हणून मला रागावतो. तेवढाच मला घाबरतोही.  टायगरला मी कधीच काही करण्यापासून रोखले नाही. तो डान्स शिकला, मार्शल आर्ट शिकला. जिमनॅस्टिकमध्येही तो पारंगत आहे. टायगर अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगतो. कधीकधी मला त्याचा हेवा वाटतो, असेही जॅकी म्हणाले.

Web Title: tiger shroff real name revealed by his father jackie shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.