सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 08:30 AM2024-04-16T08:30:52+5:302024-04-16T08:34:05+5:30
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईला यश (salman khan)
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची महत्वाची बातमी समोर येतेय. गुजरातमधील भुज येथून आरोपींंना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री उशिरा हे मोठे यश मिळाले. वृत्तानुसार, गुजरात पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छमधून दोघांना अटक केल्याची पुष्टी केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल असं या दोघांचं नाव आहे.
मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना घेऊन मुंबई गुन्हे शाखा गुजरातमधून निघणार आहे. या दोघांची मुंबईत चौकशी होणार आहे. अभिनेता सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स विश्नोईशी संबंधित लोकांची नावेही समोर आली आहेत. अखेर सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.
Thank you @MumbaiPolice and @GujaratPolice you arrested the 2 shooters who opened fire at Salman Khan's house #SalmankhanHouseFiring#SalmanKhanpic.twitter.com/f7nMSwFE9F
— SALMAN KI DUNIYA ( SIKANDAR ) (@Salmanki_Duniya) April 16, 2024
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली. सलमान आणि लॉरेन्स बिश्नोईचे जुने वैर आहे. काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला अनेक धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. असे असतानाही रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी पाच राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नव्हती. पण आता मात्र पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.