गुजरातमध्ये झळकत असलेल्या सनी लिओनीच्या कंडोम जाहिरात पोस्टर्सचा वाद चिघळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 11:01 AM2017-09-19T11:01:47+5:302017-09-19T16:42:58+5:30

काही दिवसांपूर्वीच सनीच्या या जाहिरातीला गोव्यात विरोध करण्यात आला होता. आता गुजरातमध्येही अशाप्रकारचे सनीच्या जाहिरातीचे पोस्टर्स झळकत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

Sunny Leone's condom advertisement posters in Gujarat show dissatisfaction! | गुजरातमध्ये झळकत असलेल्या सनी लिओनीच्या कंडोम जाहिरात पोस्टर्सचा वाद चिघळला!

गुजरातमध्ये झळकत असलेल्या सनी लिओनीच्या कंडोम जाहिरात पोस्टर्सचा वाद चिघळला!

googlenewsNext
ही दिवसांपूर्वीच गोव्यात अभिनेत्री सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीला कडाडून विरोध करण्यात आला होता. आता गुजरातमधील अहमदाबाद शहरात सनीच्या या जाहिरातीवरून वाद पेटला आहे. होय, शहरात नवरात्रोत्सवाचा रंग चढत असतानाच सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीचे पोस्टर जागोजागी लावले गेल्याने नागरिकांचा असंतोष वाढत आहे. गुजरात राज्यात नवरात्रोत्सवाची जबरदस्त धूम असते. अशात प्रत्येक कंपन्या त्यांचे प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात फलकबाजी करीत आहेत. त्यामध्ये सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीचेही पोस्टर झळकत असल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला जात आहे. 

सनी लिओनी एका कंडोम निर्माण करणाºया कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. याच कंपनीची जाहिरात करतानाचे काही पोस्टर शहरातील बहुतांश भागांमध्ये झळकत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाचा आधार घेऊन कंपनीने कंडोम जाहिरात करणारे हे पोस्टर जागोजागी लावले होते. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेला संदेश आपत्तीजनक असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल साइटवर हे पोस्टर्स शेअर करून लोक त्यांचा संताप व्यक्त करीत आहे. सध्या संपूर्ण अहमदाबाद शहरात या पोस्टर्सविरोधात लोक पुढे येत आहेत. 



अहमदाबाद मिरर या आॅनलाइन पोर्टलने लिहिले की, ‘पोस्टरमध्ये लिहिलेला संदेश हा आपत्तीजनक असून, त्याची नवरात्रोत्सवाशी केलेली तुलना पूर्णत: चुकीची आहे. रिपोर्टनुसार, हे पोस्टर्स फेसबुकवर अपलोड करणाºया अतित पटेल या यूजरने लिहिले की, ‘मी हे पोस्टर बघितले आणि वाचले आहे. मला असे वाटते की, यावर दिलेली माहिती ही पूर्णत: चुकीची आहे. कारण या नऊ रात्री प्रेम करण्यासाठी नाहीत, तर हा उत्सव नृत्य आणि परंपरांचे पालन करणारा आहे. त्यामुळे कंपनीला त्यांच्या उत्पादनाची जाहिरातच करायची असेल तर त्यांनी दुसरी कोणती तरी संधी शोधायला हवी.’ अतितच्या या फेसबुक पोस्टला आतापर्यंत अनेकांनी लाइक आणि शेअर केले आहे. त्याचबरोबर पोस्टरचा कडाडून विरोधही केला जात आहे. 

ALSO READ : सनी लिओनीची कंडोमची जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता गोव्यातून झाला विरोध!

वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास सनी नुकतीच ‘बादशाहो’ या चित्रपटात इमरान हाशमीसोबत आयटम नंबर करताना बघावयास मिळाली. तिचा हा आयटम नंबर चाहत्यांना खूप आवडत आहे. याशिवाय ती ‘भूमी’ या चित्रपटातही आयटम नंबर करताना बघावयास मिळणार आहे. तसेच सलमानचा भाऊ अरबाज खानसोबतही ती ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Sunny Leone's condom advertisement posters in Gujarat show dissatisfaction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.