स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटात असा असणार टायगर श्रॉफचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:53 PM2019-04-10T16:53:05+5:302019-04-10T16:53:52+5:30

स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

Student of the Year 2 new posters out: Tiger Shroff look out | स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटात असा असणार टायगर श्रॉफचा लूक

स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटात असा असणार टायगर श्रॉफचा लूक

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाच्या तिसऱ्या पोस्टरमध्ये आपल्याला टायगरचा लूक पाहायला मिळत आहे. जीन्स आणि जीन्सचे जॅकीट घातलेल्या टायगरच्या हातात एक बॅग आहे. त्याचा हा डॅशिंग लूक लोकांना चांगलाच आवडत आहे.

स्टुंडट ऑफ द इयर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाद्वारे करण जोहरने आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना लाँच केले होते. या पहिल्याच चित्रपटाने या सगळ्यांना स्टार बनवले. आलिया आणि वरुण यांनी तर आज बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडला इतके स्टार दिल्यानंतर आता तो या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

स्टुडंट ऑफ द इयर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबतच या चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. एका पोस्टरमध्ये आपल्याला एका मुलाच्या पायवर एक मुलीने पाय दिलेला दिसून येत आहे आणि त्यावर हे आव्हान घे... असे लिहिण्यात आले आहे तर दुसऱ्या पोस्टरमध्ये गेटच्या आत जात असलेला पाठमोरा टायगर श्रॉफ दिसत आहे.

तर स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाच्या तिसऱ्या पोस्टरमध्ये आपल्याला टायगरचा लूक पाहायला मिळत आहे. जीन्स आणि जीन्सचे जॅकीट घातलेल्या टायगरच्या हातात एक बॅग आहे. त्याचा हा डॅशिंग लूक लोकांना चांगलाच आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. या पोस्टरमध्ये टायगर गेटमधून बाहेर येताना दिसत आहे. 

अनन्या पांडेने नुकताच इन्स्टाग्रामवर चित्रीकरणाच्या पहिला दिवसाचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, एकमेकांची ओळख होऊन आता एक वर्षं झाले आहे. प्रत्येक दिवस आमच्यासाठी खास होता. आता केवळ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी एक महिना शिल्लक राहिला आहे. 

स्टुडंट ऑफ द इयर २ हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Student of the Year 2 new posters out: Tiger Shroff look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.