SEE PICS : ​अखेर चाहत्यासमोर नमली विद्या बालन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2017 05:17 AM2017-06-05T05:17:17+5:302017-06-05T10:47:17+5:30

एका चाहत्याने अभिनेत्री विद्या बालनला इतका वैताग आणला की, विचारू नका. बॉलिवूड सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होणार नाही? ...

SEE PICS: Ultimately, Vidya Balan faces a kiss! | SEE PICS : ​अखेर चाहत्यासमोर नमली विद्या बालन!

SEE PICS : ​अखेर चाहत्यासमोर नमली विद्या बालन!

googlenewsNext
ा चाहत्याने अभिनेत्री विद्या बालनला इतका वैताग आणला की, विचारू नका. बॉलिवूड सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होणार नाही? आता पुढ्यात चक्क विद्या बालन असेल तर विचारूच नका. असेच काहीसे एका चाहत्यासोबत घडले. बातमी चांगलीच मजेशीर असल्याने तुम्ही ती वाचायलाच हवी. तर या चाहत्याने भर दुपारी विद्याला चांगलेच भंडावून सोडले. विद्या वांद्याच्या एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. ती या पार्लरमध्ये गेली आणि नेमकी एका चाहत्याची नजर तिच्यावर पडली. मग याने जणू गेटवर ठाणचं मांडले. तो गेटवरच उभा झाला.





विद्या बाहेर येईपर्यंत तो तिथेच ताटकळत राहिला. अखेर काही तासांनंतर विद्या बाहेर आली. मग काय, विद्या येताना दिसताच हा चाहता तिला एक सेल्फीसाठी विनवणी करू लागला. कदाचित विद्या घाईत होती. त्यामुळे तिने त्या चाहत्याकडे दुर्लक्ष केले. पण चाहता चांगलाच पक्का होता. तो विद्याचा पिच्छा सोडायला तयार होईना.





ALSO READ : ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या बालनबरोबर झळकणार रणबीर कपूर!!

शेवटी काय तर विद्या वैतागली. इतकी की, तिला अखेर थांबणे भाग पडले. शेवटी ती क्षणभर थांबली आणि  त्या चाहत्यासोबत सेल्फीसाठी उभी झाली.





मग काय, त्या चाहत्याची कळी इतकी खुलली की, विचारू नका. साक्षात विद्या आपल्यासोबत सेल्फीसाठी उभी म्हटल्यावर तो अगदी ‘सातवे आसमाँ’वर होता. या क्षणाचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत. ते फोटो तुम्ही पाहायलाच हवेत. पाहा तर मग!!
सध्या विद्या बालन ​‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात विद्या पुन्हा एकदा आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: SEE PICS: Ultimately, Vidya Balan faces a kiss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.