​एकता कपूरला सगळे काही म्हणा, पण ‘ना’ म्हणू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 09:29 AM2017-12-17T09:29:29+5:302017-12-17T15:02:21+5:30

मौनी राय आता ‘नागिन3’मध्ये नसणार, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, एकता कपूरच्या या सुपरहिट शोमध्ये आता अनिता हसनंदानी आणि ...

Say Ekta Kapoor everything, but do not say 'no'! | ​एकता कपूरला सगळे काही म्हणा, पण ‘ना’ म्हणू नका!

​एकता कपूरला सगळे काही म्हणा, पण ‘ना’ म्हणू नका!

googlenewsNext
नी राय आता ‘नागिन3’मध्ये नसणार, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, एकता कपूरच्या या सुपरहिट शोमध्ये आता अनिता हसनंदानी आणि सुरभि ज्योती यांची वर्णी लागली आहे. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की,अनिता हसनंदानी व सुरभि ज्योती या दोघींआधी नागीन बनण्याची आॅफर दुस-याच एका हिरोईनला मिळाली होती. होय, एकता कपूरने सर्वप्रथम संजीदा शेख हिला नागीन बनण्याची आॅफर दिली होती. पण दुर्दैवाने  या सुपरहिट शोमध्ये नागीन बनण्याची संधी संजीदा गमावून बसली.



आता याचे कारण काय, हे तर तुम्हाला कळायलाच हवे. याचे कारण आहे, बालाजी टेलिफिल्म्सचा एक खास शो बॉक्स क्रिकेट लीग. बालाजी टेलिफिल्म्सच्या या शोमध्ये टेलिव्हिजनच्या मोठ मोठ्या सेलिब्रिटी सहभागी होता. संजीदानेही या शोमध्ये सहभागी व्हावे, अशी एकता कपूरची इच्छा होती. पण संजीदाने याला नकार दिला. कारण ती अन्य काही प्रोजेक्टमध्ये बिझी होती. पण एकताला ‘ना’ ऐकण्याची सवय नाही, हे तुम्ही जाणताचं. मग काय, ऐनवेळी ‘नागीन3’मधील संजीदाचा पत्ता कट झाला. नाराज एकताने संजीदाने काहीही ऐकून न घेता, तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. संजीदाने तिला समजवण्याचे बरेच प्रयत्न करून पाहिले. पण एकताने तिचे एक ऐकले नाही. 
यापूर्वी सुशांत सिंग राजपूतवरही एकता अशीच नाराज झाली होती. त्याने ‘पवित्र रिश्ता’ हा शो सोडल्यामुळे ती बिथरली होती. अर्थात आता इतक्या वर्षांनंतर सुशांत व एकतामधील वातावरण बरेच कूल झालेय. आता तर एकताच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात सुशांत लीड रोलमध्ये आहे. ‘नागीन’ हा छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक यशस्वी शो राहिला. यात मौनी राय लीड रोलमध्ये दिसली होती. ‘नागीन2’मध्येही मौनीचीच वर्णी लागली होती. हा दुसरा भागही सुपरहिट ठरला होता.

Web Title: Say Ekta Kapoor everything, but do not say 'no'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.