​सलमान खान पूर्ण करणार आपल्या ‘सर्वांत मोठ्या’ चाहतीची इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 03:52 PM2017-02-16T15:52:19+5:302017-02-16T21:35:24+5:30

बॉलिवूडचा दंबग सलमान खान आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की,  सलमान आपल्या फॅन्ससाठी काहीही ...

Salman Khan wishes to fulfill his 'biggest' wish! | ​सलमान खान पूर्ण करणार आपल्या ‘सर्वांत मोठ्या’ चाहतीची इच्छा!

​सलमान खान पूर्ण करणार आपल्या ‘सर्वांत मोठ्या’ चाहतीची इच्छा!

googlenewsNext
लिवूडचा दंबग सलमान खान आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की,  सलमान आपल्या फॅन्ससाठी काहीही करू शकतो, आता याची उपरती पुन्हा एकदा होणार असल्याचे समजते आहे. तो आपल्या सर्वांत ‘मोठ्या’ चाहतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनी याला दुजोरा दिला आहे. रिल लाईफमधील बजरंगी भाईजान खºया आयुष्यातही त्याच रुपात दिसेल याची उपरती होणार असल्याचे समजते. 

जगातील सर्वांत लठ्ठ महिला इजिप्तची ईमान अहमद अबदुलाती सध्या उपचारासाठी मुंबई आहे. दरम्यान तिने सर्जरीपूर्वी सलमान खानशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये ईमानवर सर्जरी करण्यात येणार आहे. मीडियात आलेल्या बातम्यानुसार, हॉस्पिटलकडून अधिकृतरित्या सलमानला इमानशी भेट घेण्याबद्दलचे बोलावणे आल्यास तो तिला भेटायला नक्कीच जाईल असे सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सांगितले. असेही सांगण्यात येते की, ईमान बॉलिवूडमधील तिन्ही खान आमिर, शाहरुख व सलमान खानची चाहती आहे. मात्र सलमान तिचा फेव्हरेट स्टार आहे. यामुळेच ईमानला सलमानला भेटण्याची प्रबळ इच्छा आहे. 

५०० किलो वजन असलेली ईमान जगातील सर्वांत लठ्ठ महिला आहे. ईमानला एका स्पेशल विमानाने इजिप्तहून भारतात आणण्यात आले होते. तिला प्लेनमधून उतरविण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली होती. शिवाय एका खास ट्रकमध्ये तिला ठेवून हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात आले होते. अत्याधिक वजन असल्यामुळे ईमान हालचाल करू शकत नाही. तिच्यावर डॉ. मुज्जफल लकडावाला उपचार करीत आहे. आम्हाला माहिती आहे की, ईमानला बॉलिवूड चित्रपट व टीव्ही सिरीअल्स आवडतात, तिच्या मनोरंजनासाठी आम्ही ईमानच्या खोलीत टीव्ही लावला आहे. 

Web Title: Salman Khan wishes to fulfill his 'biggest' wish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.