मुंबईतील रस्त्यावर फिरत होती सैफची मुलगी सारा अली खान, पण कोणी ओळखलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 09:00 PM2019-01-26T21:00:00+5:302019-01-26T21:00:00+5:30

सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच युजर्स तिची खिल्लीही उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Saif's daughter, Sarah Ali Khan, was walking in the streets of Mumbai, but nobody knew about it | मुंबईतील रस्त्यावर फिरत होती सैफची मुलगी सारा अली खान, पण कोणी ओळखलेच नाही

मुंबईतील रस्त्यावर फिरत होती सैफची मुलगी सारा अली खान, पण कोणी ओळखलेच नाही

googlenewsNext

मुंबई… धावणारी माणसं… प्रत्येक मुंबईकर घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. आपल्या कामात दंग असणाऱ्या मुंबईकराला कधीकधी काय सुरु आहे हेसुद्धा कळत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. जिम सेशननंतर सारा पायीच रस्तावर निघाली आणि रास्ता क्राॅस करून आपल्या कारकडे जातानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायल झाले आहेत. यावेळी  काही फोटोग्राफरने मात्र तिला ओळखले आणि साराचे फोटोज घेण्याचा प्रयत्न करू लागले. फोटोत सारा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.याआधीही सारा अनेकदा जिम लूकमध्ये स्पॉट झाली असून अनेकदा फॅशन आणि स्टाइलबाबत कॉन्शिअस असलेली सारा जिम लूकमध्येही एक्सपरिमेंट करताना दिसून येते. तुर्तास हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच युजर्स तिची खिल्लीही उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी म्हटले आहे की 'मुंबईमध्ये थंडी नाहीये का ?' अशा अनेक भन्नाट कमेंटस् साराच्या या फोटोेंवर नेटीझन्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा गोडवा चाहत्यांना दिलाच. पण त्याहीपेक्षा सारा आपला फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असते. पण साराने या ग्लॅमरस लूकसाठी फार मेहनत घेतली आहे. पीसीओडी या आजाराने ग्रस्त असलेल्या सारा अली खानचं वजन जवळपास 96 किलो होतं. परंतु बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी साराने अत्यंत मेहनत घेऊन आपलं फिटनेस मेन्टेन ठेवलं आहे. सध्या सारा बॉलिूडमधील नवीन जनरेशनची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फॅटपासून फिट होण्यासाठी साराने खूप मेहनत केली आहे. साराने केवळ आपले डाएटचा कंट्रोल केले नाही तर तिने जिमला आपल्या नित्य सवयीमध्ये सामील केले. एवढेच नाही तर योगा आणि कत्थक डान्सनेही तिला सुंदर बनवण्यात मदत केली.  

‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’नंतर साराच्या हाती आणखी एक बिगबजेट चित्रपट लागला आहे. या चित्रपटात सारा टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. आता हा चित्रपट कुठला, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर या चित्रपटाचे नाव आहे, ‘बागी 3’. होय, चर्चा खरी मानाल तर साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटासाठी साराशी संपर्क साधला आहे. आता या चर्चेत किती सत्यता हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Saif's daughter, Sarah Ali Khan, was walking in the streets of Mumbai, but nobody knew about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.